आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात वायू प्रदूषणाने १२ लाख लोकांचा मृत्यू; घरातील प्रदूषण हवेला प्रदूषित करतेय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - वायू प्रदूषणामुळे २०१७ दरम्यान भारतात १२ लाख लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने आपल्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०१९ या अहवालातून हा दावा केला आहे. २०१७ दरम्यान हृदयविकाराचा धक्का, फुप्फुसाचा कर्करोग, मधुमेह इत्यादी आजारांमुळे जगभरात ५० लाखावर लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी ३० लाख लोकांचा मृत्यू थेट पीएम २.५ कणांमुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

 

अहवालानुसार प्रदूषणामुळे दक्षिण आशियात जन्मलेल्या मुलांच्या वयोमानात अडीच वर्षांनी घट झाली आहे. जागतिक पातळीवर त्यामुळे मुलांच्या वयोमान २० महिन्यांपर्यंत कमी होण्यासारखे परिणाम दिसून येतील. रस्ते अपघात, मलेरियाच्या तुलनेत प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जास्त असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. भारताने प्रदूषणाशी मुकाबला करण्यासाठी अनेक चांगल्या योजना तयार केल्या आहेत. मात्र या योजना योग्य पद्धतीने अमलात आणल्या गेल्या तरच त्याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. या समस्येच्या बाबतीत चीन व भारताची स्थिती सारखीच आहे. भारतात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमागील तिसरे मोठे कारण प्रदूषण ठरले आहे. 

 

अहवालात दक्षिण आशियाला सर्वाधिक प्रदूषित मानले गेेले आहे. येथे दरवर्षी १५ लाख लोकांचा प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होत आहे. चीन व भारतात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या समान आहे. परंतु तुलनेने चीनने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचा दावा संस्थेने केला आहे. भारताताली प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. 

 

 

घरातील प्रदूषण हवेला प्रदूषित करतेय  
२०१७ मध्ये जगातील निम्मी लोकसंख्या अर्थात ३६०० कोटी लोकांवर घरात होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम दिसून आला. आर्थिक विकास वेगाने होऊ लागल्यामुळे पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करण्याची सवय कमी झाली आहे. परंतु भारतात अद्यापही ६० टक्के व बांगलादेशात ७९ टक्के लोक अशा पद्धतीने स्वयंपाक तयार करतात. त्यामुळे घरात प्रदूषण वाढू लागले आहे. घरातील हे प्रदूषण बाहेरील हवेलादेखील प्रदूषित करू  लागले आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...