आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज दंगलीला एक महिना पूर्ण, उद्योगातील तोडफोड हा हुल्लडबाजीचा प्रकार; पोलिसांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदचा आधार घेत ९ ऑगस्ट रोजी समाजकंटकांनी वाळूज एमआयडीसीतील ७० कंपन्यांत हैदोस घातला. यामुळे उद्योगजगतात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेला ९ सप्टेंबर रोजी महिना पूर्ण होत आहे. यानिमित्ताने 'दिव्य मराठी'च्या चमूने तेथील स्थितीचा आढावा घेतला.

 

महिनाभरात वाळूजमधील कारखाने पूर्वपदावर आले असून शिफ्टही नियमित सुरू झाल्या आहेत. दंगलीची चर्चा मात्र अजून कायम आहे. दरम्यान, संघटना आणि पोलिसांनी तोडफोड करणारे आंदोलक नसल्याचे स्पष्ट केले. मग तोडफोड करणारे नेमके कोण, त्यांचा हेतू नेमका काय होता, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. हा हुल्लडबाजीचाच प्रकार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...