Weekly Horoscope / साप्ताहिक राशिफळ : जुलैच्या सुरुवातीचे 7 दिवस ठीक नाहीत 7 राशींसाठी, धनहानी आणि तणावाचा राहील काळ

12 राशींसाठी काहीसा असा राहील जुलै महिन्यातील पहिला आठवडा

दिव्य मराठी

Jul 02,2019 12:05:00 AM IST

1 ते 7 जुलै या काळात सूर्य-चंद्रावर राहू-केतूची अशुभ छाया राहील. यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. यासोबतच हे ग्रह शनीच्या दृष्टीनेही पीडित राहतील. यामुळे मेष, मिथुन, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ ठीक नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या 7 राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त वृषभ, कर्क, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी सात दिवस ठीक-ठाक राहतील. या पाच राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल.


मेष
द्वितीय चंद्र पराक्रम कमी करू शकताे. करायला जाल एक अन् हाेईल वेगळे. स्वत:वर नियंत्रण ठेवा. उत्पन्न कमी हाेणार नाही. माैल्यवान वस्तू हरवण्याची भीती असून नकाे असलेली कामे करावी लागण्याची शक्यता. सप्ताहात उत्पन्न कमी हाेण्याची शक्यता. निराश हाेऊ नका.


व्यवसाय : व्यवसायात सावधता. नाेकरीत मन लागणार नाही.
शिक्षण : नवीन जाणून घेण्याची इच्छा राहील. प्राचीन विद्येचे आकर्षण वाढेल
आराेग्य: डाेळ्यांची जळजळ हाेऊ शकते. हाडे,सांधेदु:खी त्रासाची शक्यता
प्रेम : जाेडीदार सकारात्मक राहील.
काय कराल : निर्धन व्यक्तीला अन्न दान करा


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

वृषभ वेळ अनुकूल राहील.आर्थिक गरजा पूर्ण हाेतील. जुन्या कर्जामध्ये दिलासा मिळेल. याेजना यशस्वी हाेतील व नवीन काम मिळण्याची शक्यता. वादग्रस्त प्रकरणात बाजू भक्कम राहील आणि कुटुंबात स्थिती मजबूत राहील. शनिवारी उत्पन्न कमी हाेऊ शकते. संभाळून राहावे लागेल. व्यवसाय : पूर्णक्षमतने कार्य करण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठ प्रशंसा करतील शिक्षण : शिक्षक प्रसन्न राहतील, वर्गात श्रेष्ठ राहाल. मेहनतीचे फळ मिळेल. आराेग्य : दात, सांधे दुखण्याची शक्यता, पाेटचांगले राहणार नाही प्रेम : जाेडीदाराकडून आनंद मिळेल काय कराल : राधा-कृष्णाचे दर्शन घ्या, खडीसाखर दाखवामिथुन पाच ग्रहांच्या प्रभावामुळे लाभाच्या संधी आहेत पण द्वादश चंद्र अडचणी निर्माण करेल. मंगळवारी संध्याकाळी काही दिलासा मिळण्याची शक्यता. विराेधक भारी पडू शकतात पण स्वप्रयत्नाने त्यावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी व्हाल.नेत्यांना यश मिळण्याची शक्यता. व्यवसाय : व्यापारातील अडचणी दूर हाेतील. नाेकरीत कालावधी राहील. शिक्षण : अभ्यासात रुची राहील, नवीन विषयांकडे आकर्षित व्हाल. स्वास्थ्य : चिंता वाढेल, अज्ञातांची भीती राहील. खाेकल्याचा त्रास संभवताे. प्रेम : जाेडीदाराच्या भेटीने वाद संपतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. काय कराल : हनुमानास तुपाचा दिवा लावावाकर्क गुरुची दृष्टी, एकादश चंद्र व्यक्तिमत्त्व प्रभावशाली बनवेल. उत्पन्न प्रकरणात बुधवार- गुरुवार साेडून अन्य सर्व दिवस चांगले राहतील. जमिनीतून लाभ मिळण्याची शक्यता आणि वारसाहक संपत्तीशी संबंधित वाद हाेऊ शकताे. शनिवारी कुटुंबाबराेबर फिरण्याची संधी मिळेल. व्यवसाय : बेरोजगारांना रोजगार मिळू शकताे. बढतीची शक्यता. शिक्षण : अभ्यासाप्रति सजग राहिल्यास अपेक्षित फळ मिळेल. आराेग्य : पाय दुखणे व सर्दी हाेऊ शकते. जखमही हाेऊ शकते. प्रेम : जाेडीदाराबराेबरचा वाद मिटेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. काय कराल : १०८ वेळा श्रीहरी नावाचा जप करासिंह राशींची स्थिती भक्कम राहील. अडचणी संपतील. नवीन कामे मिळतील. कार्यक्षेत्राचा विस्तार हाेईल. प्रयत्नांतून समस्यांचा उपाय सापडेल. घरगुती समस्या सुटतील. चंद्राच्या गाेचरमुळे धनाची सहज आवक हाेईल. गुरुवारी संध्याकाळी चिंता कमी हाेतील. व्यवसाय : लाभदायक व्यवहारांची प्राप्ती.नाेकरीत जबाबदारी वाढेल शिक्षण : अति आत्मविश्वास नुकसान करू शकते. संयम बाळगा आराेग्य : दातदु:खी आणि त्वचा विकाराची समस्या हाेऊ शकते. प्रेम : जाेडीदाराची साथ मिळणार नाही. वादाची स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता. काय कराल : निर्धन विद्यार्थीची मदत कराकन्या नवांशामधील राशी स्वामी बुधचा गोचर चांगले कार्य घडवेल. चंद्राचा गाेचर उत्पन्न चांगले ठेवेल. सप्ताहात काेणत्याही अडचणीची शक्यता नाही. वादग्रस्त प्रकरणात तुमची बाजू भक्कम राहील. शनिवारी धनप्राप्तीचा योग आहे. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. व्यवसाय : नाेकरीत उत्तम कामगिरीत यश मिळेल. गुंतवणूक लाभाची ठरेल. शिक्षण : शिक्षक मदत करतील, स्वाध्यायातून प्रसन्नता प्राप्त होईल. आराेग्य : नसा व सांधे दुखण्याची शक्यता. सावधानतेने वाहन चालवा. प्रेम : वैवाहिक प्रस्ताव सकारात्मक असेल. जाेडीदाराची मदत मिळेल. काय कराल : महाकालीला रक्त पुष्प अर्पण करातूळ मंगळाची दृष्टी आणि अष्टमातील चंद्र यामुळे आठवड्याच्या प्रारंभी उत्पन्नावर परिणाम हाेऊ शकताे. विश्वासू लाेक धाेका देण्याची शक्यता असून गुप्त याेजना बाहेर येऊ शकतात. बुधवारी स्थिती पुन्हा सुधारेल आणि शनिवारी काैटुंबिक समस्या सुटण्याची शक्यता. व्यवसाय : नाेकरीत बदल हाेऊ शकताे. व्यावसायिक प्रवास लाभदायक हाेईल. शिक्षण : अभ्यासावरून लक्ष उडाल्याने मागे पडण्याची शक्यता आराेग्य : ताण आणि क्रोध जास्त राहील. डाेकेदुखीची शक्यता प्रेम : विरह योग समाप्त हाेईल, आवडत्या व्यक्तींची भेट हाेईल. काय कराल : महालक्ष्मीचे दर्शन घ्या.वृश्चिक राशीवर चंद्राची दृष्टी राहून प्रारंभ चांगला हाेईल पण सप्ताहाच्या मध्यास अडचणींचा सामना करावा लागू शकताे. गुरुचा वक्री गाेचर समस्या निर्माण करेल. योजना विफल ठरतील आणि जवळची लाेकही त्रास देतील. गुरुवारी संध्याकाळी पुन्हा कामामध्ये गती मिळेल. व्यवसाय : व्यापारात अनाेळख्या व्यक्तींपासून सावध रहा. शिक्षण : उत्साह कायम राहील, नवीन प्रकल्प मिळतील आराेग्य : डाकेदुखी व तणाव होऊ शकताे.वाहनाचे नुकसान होऊ शकते. प्रेम : जाेडीदाराबराेबरचा तणाव संपेल. वैवाहिक जीवनात समाधान राहील. काय कराल : शंकराला फळे, बिल्व पत्र अर्पण करा.धनू शनि-केतुच्या गाेचरमुळे आचानक लाभ हाेण्याचे याेग आहेत. जमिनीच्या प्रकरणात यश मिळेल. काैटुंबिक समस्या दूर हाेतील आणि वादात यश मिळेल. गुरुवारपर्यंतचा कालावधी श्रेष्ठ राहील. शुक्रवारपासून उत्पन्न कमी हाेऊ शकते. कामाच्या ठिकाणी वादाची शक्यता. व्यवसाय : आठवड्यात जाेखमीची गुंतवणूक करू नका. शिक्षा : वेळेनुसार कामे करू शकणार नाहीत. यामुळे मागे पडण्याची शक्यता आराेग्य : नसांमध्ये ताण आणि डाेके दुखण्याची शक्यता आहे. प्रेम : विवाह ठरण्याची शक्यता आहे. प्रेमात यश मिळेल. काय कराल : शिव-पार्वती समाेर तुपाचा दिवा लावामकर संर्पकाचा लाभ मिळेल. मागे पडून देखील बराेेबरींच्यामध्ये श्रेष्ठ रहाल. राजकीय नेत्यांसाठी चांगली वेळ विराेधकांवर दबाव आणण्यात यशस्वी व्हाल. शुक्रवारी तक्रारी एेकायला मिळू शकतील. शनिवार संध्याकाळी सांभाळून रहा. व्यवसाय : उत्पादकांना सावधानतेने काम करावे लागेल. शिक्षण : वर्गात श्रेष्ठ राहण्याची संधी हातून जाण्याची शक्यता स्वास्थ्य : उजव्या पायाला जखम व त्वचेसंबंधी समस्या हाेण्याची शक्यता प्रेम : वैवाहिक जीवनात तणाव कमी हाेईल.जाेडीदाराशी मतभेद ाची शक्यता काय कराल : हनुमानाला कुंकू लावाकुंभ शनी- मंगळाची दृष्टी राहील. अष्टमातील चंद्रामुळे सुरुवात खराब हाेऊ शकते. साेमवार, मंगळवार चिंतेचा ठरू शकताे. भविष्याबद्दल चितंा वाटेल. उत्पन्नात वाढ हाेईल, कार्याला गती मिळेल. जमिनीशी निगडीत प्रकरण तुमच्या बाजुने हाेईल. व्यवसाय : माैल्यवान धातु व्यावसायिकांची स्थिती चांगली राहील शिक्षण : सगळे काही येत असून मागे पडण्याची शक्यता. कामगिरीत घसरण प्रेम : जाेडीदाराचे सहकार्य मिळणार नाही.वैवाहिक जीवन सुदृढ़ राहील. आराेग्य : ताेंड येण्याची शक्यता असून कमजाेरी जाणवेल काय कराल: ॐ ऐं दुर्गायै नम: मंत्राचा जप करामीन छोटे-छोटे नुकसान हाेऊ शकतात. तृतीयेतील चंद्र उत्पन्न चांगले राखेल. दुसऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे त्रास हाेईल आणि काैटुंबिक प्रकरणे हाताळण्यात यश मिळेल. धार्मिक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल. व्यवसाय : जमीनीशी निगडीत काम करणाऱ्यांना लाभ आणि नाेकरीत बढती. शिक्षण : अभ्यासासाठी वेळ मिळणार नाही तरीही चांगली कामगिरी कराल आराेग्य : फाेडांमुळे त्रास हाेऊ शकताे. डावा पाय दुखेल प्रेम : प्रेमाच्या प्रस्तावात निराशा हाेऊ शकते. काय कराल : श्री राम - सीतेचे दर्शन घ्या
X