Home | Maharashtra | Mumbai | 1 year imprisonment for drinking alcohol in public, private bill submission

सार्वजनिक ठिकाणी दारू प्यायल्यास १ वर्षाची कैद, खासगी विधेयक सादर

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jun 25, 2019, 09:55 AM IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे उपाय आवश्यक - आमदार भातखळकर

  • 1 year imprisonment for drinking alcohol in public, private bill submission

    मुंबई - दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या मद्यपींवर महाराष्ट्रात यापुढे कठाेर कारवाई हाेऊ शकते. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत विधानसभेत एक खासगी विधेयक मांडले आहे. अशा दारुड्यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची तरतूद या विधेयकात आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ८५ मध्ये संशाेधन करून भातखळकर यांनी हे खासगी विधेयक सादर केेले आहे. त्यावर चर्चा झालेली नाही.


    कायद्यात असा बदल अपेक्षित: सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गाेंधळ करताना पहिल्यांदा काेणी पकडला गेल्यास त्याला एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड करण्याचे भातखळकर यांच्या विधेयकात प्रस्तावित आहे. दुसऱ्यांदा असा प्रकार केल्याचे आढळले तर २ वर्षांची शिक्षा व २० हजार रुपये दंडाचीही सूचना आहे. सध्याच्या महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ८५ च्या उपकलम २ मध्ये असे संशाेधन करण्याची त्यांची सूचना आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे उपाय आवश्यक असल्याचे आमदार भातखळकर म्हणाले.

Trending