आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या कामकाजावर निर्बंध घातल्यामुळे 10-12 हजार शिक्षकांच्या पगार लटकण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑनलाईन सेवा घेणाऱ्या राज्यातील सहकारी बँकेसह विविध बँका मोठया अडचणीत सापडल्या आहेत

औरंगाबाद- येस बँकेच्या कामकाजावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यामुळे या बँकेचा आयएफएसई कोड घेतलेल्या राज्यातील सर्व बँका अडचणीत आल्या आहेत, यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश असल्याने जिल्ह्यातील 10 ते 12 हजार शिक्षकांचे पगार लटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बँकेने पर्यायी व्यवस्था करून शिक्षकांचे पगार वेळेत करावेत, अशी मागणी जिल्हा माध्यमिक व उच्च शिक्षण मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  

‘आरबीआय’ने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे येस बँकेसोबत त्यांची ऑनलाईन सेवा घेणाऱ्या राज्यातील सहकारी बँकेसह विविध बँका मोठया अडचणीत सापडल्या आहेत. यात खासगी बँकांचा समोवश असून औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील शिक्षकांचे वेतन हे याच बँकेमार्फत होते. सहकारी बँकेनेही येस बँकेचे आयएफएससी कोड वापरून बँकेचे आरटीजीएस, एनईएफटी, चेकक्लिअरिंग आदी व्यवहार हे ऑनलाईन सेवा येस बँकेमार्फत चालतात. मात्र, आरबीआय बँकेने 5 मार्च रोजी येस बँकेवर टाकलेल्या निर्बंधामुळे जिल्ह्या बँकेचे सर्वच ऑनलाईन व्यवहार 'ठप्प झाले आहे. त्याचा फटका शिक्षकांना बसणार आहे, कारण त्यांचे पगार लटकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आगामी वेतन वेळेवर मिळण्याची शक्यता धुसर बनली आहे.

शिक्षकांचे पुढील वेतन हे निर्धारित कालावधी अदा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मनोहर सुरगडे पाटील, मराठवाडा अध्यक्ष युनुस याकुब पटेल, पी. एम. पवार  यांनी केली आहे. यावेळी निवेदन उपशिक्षणाधिकारी राजेश साळुंके, वेतन पथक अधीक्षक बाळासाहेब पवार आदींची उपस्थिती होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या कामकाजावर निर्बंध घातल्यामुळे अन्य बँकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे, याचा फटाका शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेलाही बसला आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी  महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली, यासाठी लाभार्थ्यांच्या दोन याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असून आधार प्रमाणिकरणाबरोबर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येत असताना येस बँकेवर निर्बंध आल्यामुळे या योजनेवरही परिणाम झाला आहे, त्यामुळे खात्यावर पैसे कधी जमा होणार याची प्रतीक्षा कर्जबाजारी शेतकऱ्यांना लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...