Home | International | Other Country | 10 Amazing People Actually Exists

OMG: विश्वास बसणार नाही! खरोखर अस्तित्वात आहेत ही 10 माणसे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 05:21 PM IST

एक व्यक्ती अशीही आहे, जी गेल्या 43 वर्षांपासून झोपलीच नाही. तरीही, तो अतिशय ठणठणीत आहे.

 • 10 Amazing People Actually Exists

  इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी नेहमीच खोट्या नसतात. बऱ्याचवेळा आपल्या फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर असे व्हिडिओ आणि फोटो येतात, ज्यांना पाहून प्रश्न पडतो की हे शक्य तरी असेल का? आज आम्ही अशाच काही मोजक्या व्यक्तींबद्दल माहिती देत आहोत. त्यापैकीच एका माणसाच्या शरीरात फक्त 3 टक्के फॅट आहे. कुणाचे लांब पाय तर कुणाची लांब-लचक जीभ गिनीझ बुकात नोंदलेली आहे. कुणी आयुष्यभर धावू शकते. तर एक व्यक्ती अशीही आहे, जी गेल्या 43 वर्षांपासून झोपलीच नाही. तरीही, तो अतिशय ठणठणीत आहे.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच अजब-गजब व्यक्तींबद्दल...

 • 10 Amazing People Actually Exists

  स्काय ब्रॉबर्ग
  या महिलेच्या नावे 5 जागतिक विक्रम आहेत. त्यामध्ये टेनिस बॅटमध्ये आपले पूर्ण शरीर टाकून बाहेर काढणे, 1.7 मीटरची बॉडी अवघ्या 52*45 सेंटीमीटर बॉक्समध्ये फक्त 4.78 सेकंदात ठेवणे, त्याच बॉक्समध्ये कपडे बदलणे असे भन्नाट विक्रम आहेत. 

   

 • 10 Amazing People Actually Exists

  मिशेल कॉबके
  मिशेल कॉबके जन्मतः अशी नव्हती. 16 इंच कंबरेमुळे ती 2013 मध्ये जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. तिने सलग तीन वर्षे टाइट कॉर्सेटमध्ये (युरोपातील एक प्राचीन पोशाख) झोपून स्वतःची ही अवस्था केली. आणखी एक इंच कमी करणार असे ती सांगते. मात्र, डॉक्टरांनी तिला पाठीचा कणा आणि बरगड्या मोडतील असा इशारा दिला आहे.

 • 10 Amazing People Actually Exists

  सर्वात लांब पाय
  रशियाची माजी बास्केटबॉल प्लेअर एकॅटरिना लिसीना आपल्या लांब पायांमुळे जगभरात प्रसिद्ध झाली. 2017 मध्ये तिचे नाव गिनीझ बुकमध्ये नोंदवण्यात आले. यानंतर तिला मॉडेलिंगचे कॉन्ट्रक्ट देखील मिळाले. तिच्या फक्त पायांचीच उंची 4.33 फुट आहे. तिने सर्वात लांब पाय आणि सर्वात उंच मॉडेल असे दोन विक्रम आपल्या नावे केली आहेत. 

 • 10 Amazing People Actually Exists

  सर्वात केसाळ
  चीनमध्ये राहणाऱ्या यू झेनहुआनला जगातील सर्वात केसाळ मनुष्याचे नाव मिळाले आहे. त्याच्या शरीराच्या 96% टक्के भागावर घनदाट केस आहेत. उर्वरीत भाग ज्यावर केस नाहीत ते तळहात आणि तळपाय आहेत. गिनीझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या या यू आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटोज वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

 • 10 Amazing People Actually Exists

  सर्वात मस्क्युलर
  कुणी दररोज व्हायरल होऊ शकते काय? या प्रश्नाला ऑस्ट्रियाचा मसलमॅन हेलमट स्ट्रेबल चपखल उत्तर आहे. आपल्या पिळदार शरीरयष्टीमुळे तो दररोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. त्याच्या शरीराचे प्रत्येक मसल अगदी माणसाच्या बॉडी डायग्रामप्रमाणे स्पष्ट दिसते. स्किनपासून बोनपर्यंत त्याच्या शरीरावर फक्त मसल्स असून फॅट फक्त 3 टक्के आहे. विशेष म्हणजे, त्याचे वय 50 वर्षे आहे. 

 • 10 Amazing People Actually Exists

  सर्वात लांब केस असलेला माणूस
  ट्रॅन व्हॅन हे (व्हिएतनाम) जगातील सर्वात लांब केस असलेला मनुष्य म्हणून आजही जिवंत आहेत. 50 वर्षे डोक्यावर कपडा बांधून त्यांनी आपले डोके लपवून ठेवले होते. जेव्हा त्यांनी कपडा काढून दाखवला तेव्हा त्यांची गिनीझ बुकात नोंद झाली. त्यांचे केस 22 फुट लांब होते. 25 वर्षांचे असताना त्यांना हेअर कट फोबिया झाला होता. तेव्हापासून त्यांनी कधीच केस कापले नव्हते. 2010 मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

 • 10 Amazing People Actually Exists

  निकिटा काचुक
  हा बॉडीबिल्डर रशियाच आर्नल्ड श्वाझनेगर म्हणूनही ओळखल्या जातो. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या या बिल्डरच्या पोस्टमध्ये त्याची बॉडी फेक असून ती केमिकल इंजेक्शनचा परिणाम असल्याचे सांगितले जाते. पण, त्याने वेळोवेळी जिममध्ये आपला स्टॅमिना आणि ताकद दाखवून सगळेच दावे फेटाळून लावले आहेत.

 • 10 Amazing People Actually Exists

  निक स्टोबर्ल
  निकच्या नावे जगातील सर्वात लांब जीभेचा विक्रम आहे. गिनीझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्याची नोंद झाली आहे. 

 • 10 Amazing People Actually Exists

  थाय नगॉक
  थाय नगॉक गेल्या 43 वर्षांपासून झोपलेच नाहीत. शेतकरी असलेले थाय 1973 मध्ये आजारी पडले होते. तेव्हापासून ते कधीच झोपलेले नाहीत. झोपत नसले तरीही त्यांच्या शरीरावर काहीच वाइट परिणाम झाला नाही.  डॉक्टर आणि संशोधकांसाठी ते अभ्यासाचा विषय ठरत आहेत. 

 • 10 Amazing People Actually Exists

  डीन कार्नेझेस
  डीन कार्नेझेस हा माणूस आयुष्यभर धावू शकतो असे म्हटले जाते. त्यांनी सलग 3 दिवस आणि 3 रात्र धावत राहण्याचा विक्रम केला आहे. धावतानाच ते जेवण आणि इतर कामे करतात.

Trending