Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | 10 April 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

दिव्य मराठी | Update - Apr 10, 2019, 12:00 AM IST

बुधवारचे राशिफळ : सौभाग्य आणि शोभन नावाच्या 2 शुभ योगामध्ये दिवसाची सुरुवात, या 8 राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास राहील बु

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    बुधवार 10 एप्रिल 2019 ला रोहिणी आणि मृग नक्षत्र असल्यामुळे सौभाग्य आणि शोभन नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आणि रिस्क घेऊन कोणतेही काम करू नये...


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    मेष - कौटुंबिक स्तरावर आज कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल. वादविवादात आपल्या मतावर ठाम राहाता येईल. वैवाहीक जिवनात सामंजस्य राहील. शुभ रंग : आकाशी, अंक-4.

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ - आज सहकारी मित्रमंडळी कडून फार अपेक्षा ठेवू नका. स्वावलंबन फायदेशिर ठरणार आहे. नकारात्मक विचार झटकून टाकणे गरजेचे आहे. शुभ रंग : आकाशी, अंक-2.

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन - प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. अपेक्षित आर्थिक लाभही होईल.  परिवारात समजूतदारपणा राहील. नोकरी व्यवसायात नियमांचे उल्लंघन नको. शुभ रंग : तांबूस, अंक-३.

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    कर्क - उद्योगव्यवसाय प्रगतीपथावर राहील. तुमचा कामातील उरक इतरांना प्रेरणा देईल‌. अधिकार गाजवण्याची संधी मिळेल. आजच्या कष्टाचे फळ उद्या नक्की. शुभ रंग : भगवा, अंक-८.

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    सिंह - स्वप्नरंजन सोडून आज  वास्तवतेचा विचार गरजेचा आहे. िदवस अनुकूल असला तरी गाफील राहू नका. फटकळ स्वभाव नुकसानास कारणीभूत होईल. शुभ रंग :नारिंगी, अंक-४. 

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    कन्या - तुम्हाला सामाजिक जिवनात मानसन्मान लाभेल. आज आर्थिक कोंडी दूर होईल. वक्त्यांनी वादग्रस्त विधाने टाळावीत. आज वास्तवतेचे भान ठेवणेही गरजेचे. शुभ रंग : निळा, अंक-1.

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    तूळ - नोकरीच्या ठीकाणी आज साहेबंच्या फार पुढे पुढे करुन अडचणीत याल. लवकर घर कसे गाठता येईल ते बघा. जोडीदाराकडून एखादी सुवार्ता येईल. शुभ रंग : हिरवा, अंक-९.

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक - कार्यक्षेत्रात मोबदला जेमतेम असला तरीही कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळवाल. दूरवरचे प्रवास कार्यसाधक ठरतील. थोरांची मने जपावी लागतील. शुभ रंग : मोरपंखी, अंक-1.

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    धनू - आज दिवस लाभाचा असून जमिनजुमला इस्टेट यासंबंधी काही कामे मार्गी लागतील. आज मुले आज्ञा पाळतील. गर्भवती मनोवांछीत संततीचा आनंद घेतील. शुभ रंग : मोतिया, अंक-5. 

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    मकर - तुमची कसोटी पाहणाऱ्या काही घटना घडतील. उद्योग व्यवसायात उद्धिष्टे गाठण्यासाठी परिश्रम वाढवाल. भावनेच्या आहारी जाण्याचे प्रसंग येतील. शुभ रंग : केशरी, अंक-7.
     

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ - कुणावरही अतिविश्वास ठेऊ नका. तरुणांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आर्थिक व्यवहार आज जपून करावेत. प्रवासात सावधगिरी बाळगा. शुभ रंग : मोरपंखी, अंक-१.

  • 10 April 2019 daily horoscope in Marathi

    मीन - मनाविरुद्ध घटना घडतील. आज हातचे सोडून पळत्यामागे अजिबात धाऊ नका. विवाह विषयक बोलणी करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. शुभ रंग : लाल, अंक-७

Trending