आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान-साैदी अरेबियामध्ये 10 अब्ज डॉलरचे करार हाेणार; बैठकीत निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तान आणि साैदी अरेबिया यांच्यात १० अब्ज डॉलरचे करार हाेण्याची शक्यता आहे. 'इज ऑफ डुइंग बिझनेसच्या (ईओडीबी) बैठकीत ही घाेषणा करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बैठकीच्या अध्यक्षस्थानी हाेते. 

 

बैठकीसंदर्भात माहिती देताना अर्थमंत्री असद उमर यांनी सांगितले की, साैदी राजपुत्र माेहंमद बिन सलमान बिन अब्दुल अजीज पुढील महिन्यात पाकिस्तान दाैऱ्यावर येणार आहेत. या वेळी दाेन्ही देशांदरम्यान १० अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी हाेणार आहे. पाकिस्तानच्या गुंतवणूक मंडळाचे चेअरमन हारुण शरीफ यांनी सांगितले की, साैदी अरेबियाने पाकिस्तानात ऑइल रिफायनरी, पेट्राेकेमिकल, अक्षय ऊर्जा व काेळसा खाणी या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी तयारी दर्शवली आहे. साैदी अरेबिया ६५ टक्के गुंतवणूक कराचीत, तर ५५ टक्के गुंतवणूक लाहोरमध्ये करणार आहे.पाकिस्तानला साैदी अरेबियाने सहा अब्ज डॉलरचे पॅकेज दिले आहे. त्याव्यतिरिक्त ही १० अब्ज डॉलरची गुंतवणूक असणार आहे. पुढील दाेन महिन्यांत पाकिस्तान चीन, संयुक्त अरब अमिरात व मलेशियासाेबतही अनेक करार करण्यात येणार आहेत. 

 

पाकिस्तानातील विज्ञान व औद्याेगिक मंत्रालयाचा राजीनामा मंजूर:

पाकिस्तानातील विज्ञान व औद्याेगिक मंत्री आजम स्वाती यांचा राजीनामा राष्ट्रपती अारिफ अल्वी यांनी मंजूर केला. इस्लामाबादचे पाेलिस प्रमुख जन माेहम्मद यांची बेकायदेशीररीत्या बदली करण्यात त्यांचा वाटा हाेता. पाकिस्तानातील तहरीक ए इन्साफ पार्टीचे सदस्य असलेल्या स्वाती यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा ६ डिसेंबर राेजी दिला हाेता. ताे ९ जानेवारी राेजी मंजूर करण्यात आला. या बदली संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. 

 

आसिफ झरदारी यांना अपात्र ठरवण्याची याचिका पीटीायकडून मागे 
पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पार्टीने (पीटीआय) पीपल्स पार्टीचे अध्यक्ष व खासदार आसिफ अली झरदारी यांना अपात्र ठरवण्याची याचिका मागे घेतली आहे. पीटीआयचे खुर्रम शेर जमान यांनी निवडणूक आयाेगाकडे झरदारींना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली हाेती. झरदारी यांंच्या रिटर्नमध्ये न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटचा उल्लेख नसल्याचा आधार घेत पीटीआयने ही याचिका दाखल केली हाेती. यासंदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याने याचिका मागे घेतल्याचे खुर्रम यांनी सांगितले. 

 

पीटीआयची १८ अघोषित बँक खाती 
पाकिस्तानमधील सत्ताधारी तेहरिक-ए इन्साफ पार्टीची १८ बँक खाती अघोषित असल्याचे जाहीर झाले आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने यासंदर्भात पाकिस्तान निवडणूक आयाेगाला अहवाल दिला आहे. पीटीआयची देशभरात २६ बँक खाती आहेत. त्यापैकी केवळ आठ खातीच घाेषित आहेत. निवडणूक आयाेगाकडे दाखल वार्षिक लेखापरीक्षण अहवालात १८ खात्यांचा काहीच उल्लेख नाही. ही खाती बनावट किंवा अघोषित खात्यांच्या श्रेणीमध्ये ठेवली गेली आहेत. दरम्यान, पीटीआयने सर्वच खात्यांची माहिती निवडणूक आयाेगाकडे दिल्याचे सांगितले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...