आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशद्रोह :देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणात कन्हैयासह १० जणांविरुद्ध आरोपपत्र...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जेएनयूत देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणात कन्हैयाकुमारसह १० जणांविरुद्ध पोलिसांनी ३ वर्षांनंतर सोमवारी आरोपपत्र दाखल केले. उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य व ७ काश्मिरी तरुणांचा मुख्य आरोपींत समावेश आहे. १२७६ पानी आरोपपत्रात पोलिसांनी दावा केला की, कन्हैयाने जमावाचे नेतृत्व केले, देशविरोधी घोषणांसाठी जमावाला चिथावणी दिली. संसद हल्ल्याचा दोषी अफझल गुरूला फाशी दिल्याच्या विरोधात ९ फेब्रुवारी २०१६ ला जेएनयूतील कार्यक्रमात उमर व अनिर्बान यांनी देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...