Home | International | Other Country | 10 died and 80 injured in US by huge storm

अमेरिकेत वादळामुळे १० ठार, तर ८० पेक्षा जास्त जखमी; दोन लाख घरांचा वीजपुरवठा ठप्प, ९ कोटी नागरिकांना फटका शक्य

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2019, 11:34 AM IST

देशात २५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांत अडकले

 • 10 died and 80 injured in US by huge storm

  वॉशिंग्टन- दक्षिण अमेरिकेत शक्तिशाली वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. टेक्सास व डलासमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला, तर ८० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. उ.कॅरोलिना, मिशिगन, मिसिसिपी व मेरीलॅंडमधील १.७० लाख घरांची वीज गुल असून, २५०० हून अधिक उड‌्डाणे रद्द केलीत. हवामान विभागानुसार या वादळामुळे न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व अटलांटातील ९ कोटी लोकांना फटका बसू शकतो.


  शिकागो, ह्यूस्टन, टेक्सास, पिट्सबर्ग व ओहियोसह डझनभर मुख्य विमानतळांनी उड‌्डाणे संचालन बंद केली आहेत. मिसिसिपी प्रशासनाच्या माहितीनुसार मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीसह जवळच्या शाळांचे २५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांत अडकलेत. १०० पेक्षा जास्त बेपत्ता झाल्याची शक्यता आहे.

  मणिपुरात वादळाने तीन ठार
  देशाच्या पूर्वोत्तर भागात सोमवारी वादळ व पावसाने अनेक घरांचे मोठे नुकसान होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. मिझोराममध्ये कोलासिबच्या वॅंरेंग्टे गावात वादळामुळे २० घरांचे मोठ्या प्रमाणावर उद‌्ध्वस्त झाली आहेत.

  कराचीत वादळाने पाच ठार
  पाकिस्तानच्या कराचीत रविवारी संध्याकाळी सुरू झालेल्या वादळाचा धुमाकूळ सोमवारीही सुरूच होता. यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून, ८६ जण जखमी झाले आहेत. शहरात प्रचंड धुळीमुळे दृश्यमानता खूपच कमी झाली होती.

Trending