आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याच्या मागणीमध्ये १० % वाढ : एमएमटीसी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - कृषी क्षेत्रातील उत्पादन चांगले झाल्याने आणि ग्रामीण भागात मागणी वाढल्याने २०१९ मध्ये देशातील सोन्याची मागणी १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,२७५ डॉलर प्रति औंसच्या सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे. आता यामध्ये आणखी तेजीची शक्यता नाही. 

 

सरकारी कंपनी एमएमटीसीचे सीएमडी वेद प्रकाश यांनी एका विशेष चर्चेदरम्यान ही माहिती दिली. एमएमटीसी ही सोन्या-चांदीव्यतिरिक्त हिरे आणि इतर रत्नांच्या आयातीसाठी सरकारची अधिकृत संस्था आहे. वेद प्रकाश यांनी सांगितले की, सरकार दागिन्यांची निर्यात वाढवण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क ४ टक्क्यांनी कमी करून ६ टक्के करू शकते. सध्या साेन्यावर १० टक्के आयात शुल्क आहे. चालू आर्थिक वर्षात सोने आयात ९०० टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सरकारी गोल्ड माॅनिटायझेशन योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत सुमारे १५ टन सोने जमा झाले आहे. यामधील एमएमटीसीने १० टन सोने भारतीय बाजारात विक्री केले आहे.