Home | Business | Personal Finance | 10 lakh accident insurance for small businesses

छोट्या व्यावसायिकांसाठी 10 लाखांचा अपघात विमा; निवडणुकीआधी केंद्र सरकार करणार घोषणा 

वृत्तसंस्था | Update - Jan 12, 2019, 07:40 AM IST

ही अपघात विमा योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या धर्तीवर असेल.

 • 10 lakh accident insurance for small businesses

  नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीआधी सरकार छोट्या व्यावसायिकांसाठी आणखी एक भेट देऊ शकते. केंद्र सरकार देशभरातील छोट्या व्यावसायिकांसाठी अपघात विमा योजना आणण्याचा विचार करत आहे. सूत्रांनुसार विम्याची रक्कम १० लाखांपर्यंत असू शकते. कंपनीच्या उलाढालीवर ती अवलंबून असेल. त्यासाठी किरकोळ प्रीमियम भरावा लागेल. जीएसटीत नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. सूत्रांनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच याची घोषणा केली जाऊ शकते.

  पंतप्रधान विम्याच्या धर्तीवर :
  ही अपघात विमा योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या धर्तीवर असेल. या योजनेत १२ रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांच्या अपघात विम्याचे सुरक्षा कवच मिळते. ही योजना १८ ते ७० वयोगटातील लोकांसाठी आहे.

  महिला उद्योजकांसाठी कर्जावर जास्त अनुदान
  सरकार महिला उद्योजकांसाठी वेगळे धोरण आखण्याची शक्यता आहे. त्यांना कर्जावर जास्त अनुदान दिले जाईल. लघुउद्योजकांकडून होणाऱ्या खरेदीत महिलांसाठी वेगळा वाटा ठेवला जाऊ शकतो.

Trending