• Home
  • 10 life changing and motivational teachings by Aristotle The Guru of Alexander the Great

Guru / सम्राट सिकंदरचे गुरू होते अॅरिस्टॉटल, त्यांच्या या 10 गोष्टी बदलू शकतात आपले आयुष्य...

प्रत्येकाने धाडसी असावे, धाडसी काम केल्याशिवाय होता येणार नाही पराक्रमी

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 11:27:00 AM IST

जगज्जेता म्हणूनही ओळखल्या जाणारा सम्राट सिकंदर आपल्या गुरूंना खूप मानत होता. अॅरिस्टॉटल हे त्याचे गुरू होते. जगप्रसिद्ध ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांचा जन्म 384 ई.पू. स्टेगेरिया नामक शहरात झाला होता. अॅरिस्टॉटल यांनी भौतिकशास्त्र, आध्यात्म, कविता, नाट्य, संगीत, राजकारण आणि धोरणांवर विविध ग्रंथ लिहिले आहेत. सिकंदरचे गुरू अॅरिस्टॉटल यांनी जीवनात यश आणि सुख प्राप्तीसाठी विविध नीती सांगितल्या आहेत. येथे जाणून घ्या, अॅरिस्टॉटल यांच्या 10 अशा गोष्टी, ज्या आपल्या अडचणी दूर करू शकतात...

1. कोणीही भित्रे आणि अविवेकी राहू नये, याउलट प्रत्येकाने धाडसी असावे. आपण धाडसी काम केल्याशिवाय पराक्रमी होऊच शकत नाही.


2. जर तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये आनंदी असाल तरच तुमचे कामामध्ये कौशल्य वाढत राहील.


3. आपली धन-संपत्ती नाही तर आपला स्वभावच आपल्याला विश्वसनीय बनवतो,


4. ज्याला व्यक्ती घाबरतो त्याच्याशी कधीही प्रेम करू शकत नाही.


5. आपल्या चांगल्या चारित्र्यामुळे आपण इतरांकडून आपले काम करवून घेऊ शकतो. चांगल्या लोकांच्या गोष्टी सर्वजण मान्य करतात.


6. पुन्हा चांगली सुरुवात करण्याऐवजी अपूर्ण काम पूर्ण करा.


7. काहीही शिकणे हा लहान मुलांचा खेळ नाही. आपण त्रासाशिवाय काहीच शिकू शकत नाहीत.


8. मित्र बनवणे घाईचे काम आहे परंतु मैत्री हळू-हळू पिकणारे फळ आहे.


9. आपले जीवन तेव्हाच सार्थक आहे जेव्हा आपण सर्व लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते प्राप्त करतो.


10. तुम्हाला लिहिण्याची इच्छा असेल तर एक सामान्य व्यक्तीप्रमाणे राहावे परंतु एक बुद्धिमान व्यक्तीप्रमाणे विचार करावा.

X
COMMENT