Home | International | Other Country | 10 month old boy who choked to death by a piece of apple

सफरचंदाच्या एका तुकड्याने घेतला या चिमुरड्याचा जीव, लहान मुलांसाठी इशारा आहे ही घटना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 12:00 AM IST

खाण्यासाठी बाळाला सफरचंदाचा एक तुकडा दिला. तो खाल्ल्यानंतर काही वेळातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

 • 10 month old boy who choked to death by a piece of apple

  ससेक्स - इंग्लंडमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत सफरचंदाचा एक तुकडा घशात अडकल्याने 10 महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. सफरचंदाचा तुकडा अडकल्याने त्याचा श्वास गुदमरला होता. आई वडिलांबरोबर पिकनिकला गेला असताना ही घटना घडली. घटनेनंतर त्याच्या आईने त्याला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण त्याचा फायदा झाला नाही. उपचारादरम्यान त्याने प्राण गमावला. पण जाण्यापूर्वी हे बाळ इतर अनेकांना जीवनदान देऊन गेले.


  एयरलाइन ट्रेनिंगचाही फायदा झाला नाही
  - 10 महिन्यांचा फिलिप वडील अॅडम मास्टर्स आई ल्युसी आणि भाऊ डोमिनिकबरोबर पार्कमध्ये गेला होता.
  - पार्कमध्ये गेल्यानंतर ल्युसीने बेंजामिनला खाण्यासाठी सफरचंदाचा एक तुकडा दिला. तो खाल्ल्यानंतर काही वेळातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
  - ते पाहून त्याच्या आईने लगेच पाठिवर मारत तुकडा काढण्याचा प्रयत्न केला. त्याची आई एअरलाइन कंपनीत काम करते. तिने हे सर्व एअरलाइन ट्रेनिंगमध्ये शिकले होते. पण त्या प्रयत्नांचाही काही फायदा झाला नाही.


  अनेकांना दिले जीवदान
  - या चिमुरड्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच अॅम्ब्युलन्स स्टाफने त्याच्या गळ्यात अडकलेला सफरचंदाचा तुकडा काढला. नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेले.
  - 6 दिवस मृत्यूशी झुज दिल्यानंतर 24 एप्रिलला कार्डियाक अरेस्टमुळे या चिमुरड्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या वडिलांनी त्याचे हॉदय, लिव्हर, दोन्ही किडणी, पचनसंस्था, आतडे दान केले. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर तो अनेकांना जीवनदान देऊन गेला.

  Note - जगभरातील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही घटना अशा असतात ज्या भविष्यात आपल्यासाठी इशारा ठरू शकतात. अशीच ही स्टोरी आहे.

 • 10 month old boy who choked to death by a piece of apple
 • 10 month old boy who choked to death by a piece of apple
 • 10 month old boy who choked to death by a piece of apple

Trending