आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या भावावर विश्वास ठेऊन सोडून गेली होती मुलगी, परतल्यानंतर उद्धवस्त झाला होता जीवनातील आनंद...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधरः अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीवर अत्याचार करणा-या चिकन शॉपचा मालक 20 वर्षीय लाल बहादुरला पोलिसांनी अटक केली आहे. चिमुकलीच्या आईचा हा मानलेला भाऊ होता आणि त्याला राखी बांधत असे. घटनेची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीच्या आईला दिली होती. आरोपी मुळचा नेपाळचा रहिवासी आहे. अटक झाल्यानंतर माझ्याकडून चुक झाली, असे त्याने म्हटले. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 


वर्षभरापूर्वीच झाले होते आरोपीचे लग्न..
- पोलिस अधिकारी मनमोहन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन 2 एरियामध्ये राहणा-या पीडित मुलीच्या आईने तक्रार नोंदवली होती. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती मुळची नेपाळची असून लाल बहादुरच्या घराच्या शेजारी राहात होती. तिला तीन मुले आहेत.

 

- लाल बहादुर घराजवळच एक चिकन शॉप चालवत होता. आरोपीचे महिलेच्या घरी येणे-जाणे होते आणि तो तिच्या पतीचा मित्र होता. लाल बहादुरला ही महिला भाऊ मानत असे आणि दरवर्षी राखी बांधायची.  

 

- गुरुवारी दुपारी महिला तिच्या दोन मुलांना शाळेत घ्यायला गेली. त्यावेळी आपल्या 10 महिन्यांच्या मुलीला ती लाल बहादुरकडे सोडून गेली होती.

 

- महिला अर्ध्या तासाने घरी परतली तेव्हा चिमुकली रडत होती. ती तिला घरी घेऊन आली. मुलीचे रडणे थांबत नव्हते, त्यानंतर लाल बहादुरने चिमुकलीसोबत वाईट कृत्य केल्याचे तिच्या लक्षात आले.

 

- आरोपीने महिलेला तोंड बंद न ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक जमले, तेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.  


नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता आरोपी...

- महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो दुकानाला कुलूप लावून पळून गेल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी एरियात ट्रॅप पावला, उशीरा रात्री आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. 


- पोलिसांनी कडक चौकशी केल्यानंतर आरोपीने कबुली दिली की, तो नेपाळला पळून जाणार होता. पण त्याच्याजवळ पैसे नव्हते. पैसे त्याच्या दुकानात होते. मुलीची आई त्याच्या धमकीला घाबरली असावी आणि ती पोलिसांकडे गेली नसावी असा आरोपीचा समज झाला होता. पण अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. 

बातम्या आणखी आहेत...