Home | Mirch Masala | 10 movies we can not watch with family

बॉलिवूडचे हे 10 असे सिनेमे जे तुम्ही फॅमिलीसोबत बसून मुळीच बघू शकत नाहीत, जाणून घ्या कारण?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 29, 2018, 12:05 AM IST

वर्षाला हजाराहूनजास्त सिनेमी होतात रिलीज पण असेच काही अडकतात वादाच्या भोवऱ्यात..

 • 10 movies we can not watch with family

  एन्टरटेन्मेंट डेस्कः सिनेरसिकांमध्ये सिनेमांची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून दोन क्षण निवांत मिळावे, स्ट्रेसबस्टर व्हावा यासाठी लोक वेळ काढून सिनेमे बघणे पसंत करतात. बॉलिवूडमध्ये तसे पाहता वर्षाला हजाराहून अधिक सिनेमे तयार होत असतात. मात्र त्यापैकी काही वादाच्या भोव-यातसुद्धा अडकतात. याचे कारण म्हणजे त्यातील बोल्ड कंटेंट, आक्षेपार्ह भाषा आणि न्यूडिटी हे असते.

  अनेक सिनेमांच्या रिलीजवर सेन्सॉर बंदी आणतं असतं, तर काही सिनेमांमधील बोल्ड कंटेंटला कात्री लावण्यात येते. अनेक वादांनंतरसुद्धा सिनेमे रिलीज होतात, तेव्हा त्याची फुकटातच चांगली पब्लिसिटी झालेली असते. ब-याच सिनेमांना त्यातील बोल्ड कटेंटेमुळे अॅडल्ट (A) सर्टिफिकेट देऊन रिलीज करण्याची परवानगी दिली जाते. मात्र हे सिनेमे प्रेक्षक आपल्या कुटुंबीयांसोबत बसून बघू शकत नाहीत. अनेकदा लोक आपल्या मित्रांसोबतही अशा धाटणीचे सिनेमे बघणे पसंत करत नाहीत.


  जिस्म (सीरीज)
  डायरेक्टर : फर्स्ट पार्ट- अमित सक्सेना, सेकंड पार्ट- पूजा भट

  जिस्मच्या पहिल्या भागात बंगाली ब्युटी बिपाशा बसू आणि बॉलिवूड हंक जॉन अब्राहम यांचे अनेक हॉट सीन्स होते. सिनेमाने अनेक अवॉर्डही जिंकले, मात्र बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला हा सिनेमा प्रेक्षक आपल्या कुटुंबासोबत बघू शकत नाहीत. सिनेमाच्या दुस-या पार्टमध्येही अनेक स्टीमी सीन्सचा भडीमार आहे. दुस-या भागात पोर्न स्टारहून बॉलिवूड अॅक्ट्रेस बनलेल्या सनी लिओनीने अरुणोदय सिंहसोबत अनेक हॉट सीन्स दिले आहेत.

  देव डी
  डायरेक्टर : अनुराग कश्यप
  स्टार कास्ट :माही गिल, अभय देओल आणि कल्कि कोचलिन

  'देवदास'चे हे आधुनिक व्हर्जन तरुणाईला विशेष पसंत पडले. पण आधुनिकतेच्या नावाखाली सिनेमात अनेक स्टीमी सीन्स टाकण्यात आले. सोबतच व्हल्गर भाषेचाही प्रयोग सिनेमात करण्यात आला.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच आणखी बोल्ड बॉलिवूड सिनेमांविषयी...

 • 10 movies we can not watch with family

  हंटर (2015)


  डायरेक्टर : हर्षवर्धन कुलकर्णी
  स्टार कास्ट : गुलशन देवैया, राधिका आपटे, सई ताम्हणकर आणि वीरा सक्सेना

   

  सिनेमाची कहाणी  मंदार (गुलशन देवैया) नावाच्या अशा एका व्यक्तीची आहे, जो सेक्सचा शौकीन असतो. अगदी वयाच्या 12-13 व्या वर्षीपासूनच त्याला शारीरिक संबंधाविषयीचे आकर्षण निर्माण होते. ब्लू फिल्म बघणे, तरुणींचा पाछलाग करणे आणि अनेक महिलांसोबत सेक्स संबंध बनवणे त्याचे काम असते.

 • 10 movies we can not watch with family

  हेट स्टोरी (सर्व सीरीज)


  डायरेक्टर : फर्स्ट पार्ट- विवेक अग्निहोत्री, सेकंड आणि थर्ड पार्ट- विशाल पंड्या

   

  तिन्ही पार्टमध्ये सुडाची कहाणी वेगवेगळ्या अँगलने दाखवण्यात आली आहे. पण सोबतच सेक्स सीन्सचाही सिनेमांत भडीमार आहे. याच कारणामुळे हा सिनेमा कुटुंबीयांसोबत बसून बघणे शक्य होत नाही.

 • 10 movies we can not watch with family

  रागिनी एमएमएस (सीरीज)


  डायरेक्टर : फर्स्ट पार्ट-पवन कृपलानी, सेकंड पार्ट- भूषण पटेल

   

  दोन्ही सिनेमे हॉरर धाटणीचे आहेत. पण सिनेमातील स्टीमी सीन्समुळे हा सिनेमा फॅमिलीसोबत बसून बघणे योग्य नाही.

   

 • 10 movies we can not watch with family

  बीए पास 


  डायरेक्टर :अजय बहल
  स्टार कास्ट :शिल्पा शुक्ला, शादाब खान और राजेश शर्मा

   

  आपण नेहमीच सिनेमे, मालिकांमध्ये तरुणींच्या देह व्यापाराची कथा पाहिली आहे. मात्र बी.ए.पास अशा एक सिनेमा आहे, ज्यामध्ये तरुण देहव्यापारात उतरतो. सिनेमात बोल्ड सीन्ससोबतच असे काही सीन्स होते, ते प्रेक्षकांना मानसिकदृष्ट्या त्रासदायक होते.

   

 • 10 movies we can not watch with family

  मस्ती (सर्व सीरिज)


  डायरेक्टर : इंद्र कुमार
  स्टार कास्ट : विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी

   

  मस्ती, ग्रँड मस्ती आणि ग्रेट ग्रँड मस्ती, तिन्ही सिनेमांचा कंटेंट अतिशय बोल्ड आहे. रितेश, विवेक, आफताब हे त्रिकुट आपल्या धमालमस्तीद्वारे प्रेक्षकांना हसवण्यात यसश्वी ठरले. मात्र त्यांच्या या सिनेमांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. हा सिनेमा तरुणाईला पसंत पडला, मात्र फॅमिली फिल्मच्या कॅटेगरीत हा सिनेमा मुळीच मोडत नाही.

 • 10 movies we can not watch with family

  गँग्स ऑफ वासेपुर (सीरीज)


  डायरेक्टर : अनुराग कश्यप
  स्टार कास्ट : मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, तिग्मांशु धूलिया, हुमा कुरैशी आणि ऋचा चड्ढा

   

  सिनेमात हिंसाचार मोठ्या प्रमाणात चित्रीत करण्यात आला आहे. शिवाय स्टीमी सीन्स आणि शिवीगाळसुद्धा खूप आहे

 • 10 movies we can not watch with family

  लव्ह सेक्स और धोका


  डायरेक्टरः दिबाकर बॅनर्जी
  स्टार कास्टः अंशुमन झा, राजकुमार राव, नेहा चौहान  

   

  हा एक एक्सपेरिमेंटल सिनेमा होता. बोल्ड सीन्सचा भडीमार असूनदेखील लोकांनी त्याला पसंतीची पावती दिली. मात्र कुटुंबासोबत बसून हा सिनेमा बघू नका. नाहीतर लाजिरवाणे होण्याची वेळ येईल.

 • 10 movies we can not watch with family

  जुली


  डायरेक्टरः दीपक शिवदसानी
  स्टार कास्टः नेहा धुपिया, प्रियांशू चॅटर्जी, यश टोंक, संजय कपूर 

   

  नेहा धुपियाने या सिनेमात अनेक हॉट सीन्स दिले होते. वादग्रस्त सिनेमांपैकीच हा एक सिनेमा आहे. सिनेमाच्या रिलीजपूर्वी नेहाने वादग्रस्त वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. तिने म्हटले होते, बॉलिवूडमध्ये केवळ दोनच गोष्टी विकल्या जातात, एक म्हणजे शाहरुख खान आणि दुसरी म्हणजे सेक्स.

   

Trending