आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे कृत्रिम पाय तर कुठे ड्रग्जचा बॉक्स, यूटूबर्सना सापडलेल्या 10 रहस्यमयी गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- यूटूबर्स चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी धडपड करत असतात. अशाच काही यूटूबर्स बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांना विचित्र गोष्टी सापडल्या आहेत. त्यात काही ट्रेझर हंटर आहेत तर काहींना फक्त जुन्या वस्तु गोळा करण्याचा छंद आहे. त्यासाठी ते अनेक ठिकाणी भ्रमंती करत असतात. अशाच काही युट्बयुर्सना सापडलेल्या गूढ गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

 

1- सिक्रेट बॉक्स 
एक यूट्युबर मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने जंगलात ट्रेजर हंटिग करत होता. त्यावेळी त्याला एक लोखंडाचे दार जमीनीच्या खली गाडलेल्या अवस्थेत सापडले. त्याने ते उघडून पाहिल्यावर तो हैराण झाला. कारण त्यात त्याला अनेक जुन्या गोष्टी सापडल्या. त्यात त्याला जूना अॅनॉलॉग फोन सापडला. 

 

2 पाण्यावर तरंगते फ्रीज
यूटूबर्सच्या एका ग्रूपला जंगलातील तळ्यात एक तरंगते फ्रीज दिसले. त्यांनी ते बाहेर काढले तेव्हा त्यात हुबेहूब लहान बाळासाऱखी दिसणारी बाहुली होती.

 

3 रणगाड्याचे गन बॅरेल
एका यूट्युबरला जंगलात एका रणगाड्याचे गन बॅरेल मिळाले. ते फायर केलेले गन बॅरेल वर्ल्ड वॉर 2 च्या वेळचे होते ते जर्मनीकडून फायर करण्यात आले होते.

 

4- शॉटगन
एका जणाला जंगलात जुनी शॉटगन सापडली होती. ती शॉटगन खुप जूनी होती आणि ती तेथे कशी आली हे रहस्य आहे.

 

5- अॅप्पलचा फोन
एक युट्युबर पाण्याखाली ट्रेजर हंटिंगसाठी गेला होता तेव्हा त्याला पाण्यात सॅमसंगच्या फोनचे केस सापडले. बाहेर काढून पाहिले तो हैराण झाला. कारण त्या सॅमसंगच्या बॅक केसमध्ये अॅप्पलचा मोबाईल होता. तो कोणाचा आहे आणि का फेकून दिला ते कळाले नाही.

 

6 सोन्याची रिंग
एका ट्रेजर हंटिंग यूट्युरला जंगलात सोन्याची रिंग सापडली. त्याच्या जागी दुसरे कोणी असते तर ती रिंग स्वत कडे ठेवून घेतली असती पण त्याने त्या रिंगच्या मालकाचा शोध घेतला आणि त्यांना ती रिंग दिली. नंतर समजले की, ही रिंग त्यांच्याकडून 55 वर्षांपूर्वी हरवली होती, ती एवढ्या वर्षानंतर सापडली.

 

7 आर्मी बंकर
मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने यूट्युबर जंगलात ट्रेजर हंटींग करत होता तेव्हा त्याला जमिनीखाली एक रूम सापडली. त्याने आणखी तपास केल्यावर समजले की, ते वर्ल्ड वॉर 2 च्या वेळीचे सैन्याचे बंकर होते. त्यात त्याला त्या काळातील अनेक गोष्टी सापडल्या.

 

8 मशीन गन
एका यूट्युबरला जंगलातील तलावात मॅग्नेट फिशिंग करताना वर्ल्ड वॉर 2 च्या वेळेची MP 40 मशीनगन सापडली. 

 

9 प्रोस्थेटिक लेग 
पाण्याखाली एका यूट्युबरला प्रोस्थेटिक लेग म्हणजेच कृत्रिम पाय मिळाला. तो पाय पाण्याखाली कसा आला आणि तो पाय कोणाचा होता हे मात्र कळाले नाही. 

 

10 ड्रग्स 
पाण्याखाली डायव्हींग करणाऱ्या यूटूबर्सच्या एका टीमला एक बॉक्स मिळाला. त्यांनी तो बाहेर काढून पाहिल्यावर त्यांना त्यात ड्रग्स सापडले. त्यांनी ते पोलिसांच्या स्वाधीन केले.  

 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा त्या सापडलेल्या गोष्टींचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...