आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 People Killed, More Than 20 Injured In Collision Between A Bus And Truck In Bikaner Rajasthan

बस आणि ट्रकची जोरदार धडक, ट्रकमध्ये घुसली बस; भीषण अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानच्या बिकानेर येथे सोमवारी सकाळी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती ही बस ट्रकमध्ये घुसली. या भीषण अपघातात 10 लोकांचा मृ्तयू तर 20 पेक्षा अधिक जखमी झाले. यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता. स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत आग विझवली. मात्र यात बसमधील अनेक प्रवासी भाजले गेले. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

माहितीनुसार, बस बिकानेरहून सकाळी साडेसहा वाजता जयपूरकडे जात असताना हा अपघात झाला. धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.