आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेमस ड्रग माफियाची मुले असे जगतात LIFE, सोशल साइट्सवर व्हायरल झाले हे Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशांनी भरलेल्या बॅग्स, मोठमोठ्या बंदुका... मॅक्सिकन ड्रग माफिया जोआक्विन अर्चिवलदो गुजमान लोराची मुले या अंदाजात आयुष्य जगत आहेत. सोशल मीडियावर जोआक्विन 'एल चापो' या नावाने प्रसिद्ध असून त्याची वाया गेलेली मुले त्यांचे भरपूर फोटोज शेअर करत आहे. आज आम्ही तुम्हाला सोशल साइट्सवर व्हायरल झालेले त्यांचे फोटोज दाखवत आहोत.

 

अशी करतात उधळपट्टी.... 

मॅक्सिकोच्या ड्रग माफियांमध्ये एल चापो या नावाने प्रसिद्ध आहे. चापोची मुले वडिलांच्या पैशांची उधळपट्टी करताना दिसतात. महागड्या गाड्या आणि ब्रॅण्डेड कपड्यांचे शौकिन ही मुले दारु आणि ड्रग्सच्या नशेत धुंद दिसतात. ही श्रीमंत बापाची वाया गेलेली मुले कुत्री, मांजरीसोबत वाघ घरात पाळतात. त्यांचे लाइफस्टाइल बघून प्रत्येकजण हैराण होतो. ही मुले पाण्याप्रमाणे पैसा खर्च करतात. सोशल मीडियावर त्यांना अनेक जण फॉलो करतात. अनेकजण त्यांना डेट करण्यासाठी विनंती पाठवत असतात.  

 

लांबलचक आहे मुलांची यादी   
एल चापोला 10 मुले आहेत. या ड्रग माफियाची जास्तीत जास्त मुले सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दररोज ते त्यांच्या लग्झरी आयुष्याचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. सोन्याच्या बंदुकीपासून ते नोटांनी भरलेल्या ब्रॅण्डेड बॅगेचे फोटोज त्यांच्या प्रोफाइलवर बघायला मिळतात. 

 

संपूर्ण जगाची पोलिस आहे या ड्रग माफियाच्या शोधात... 

तुरुंगातून पळ काढणा-या या ड्रग माफियाच्या मागावर संपूर्ण जगातील पोलिस आहेत. एल चापोवर अमेरिकेने 34 कोटी तर मॅक्सिकोने 25 कोटींचे बक्षिस ठेवले आहे. अलीकडेच चापोच्या मुलाने त्याच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र लोकेशन चुकीचे टाकले होते.  

 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्रीमंत बापाच्या वाया गेलेल्या मुलांचे इंस्टाग्राम फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...