आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिंत्रामध्ये जबाँगचे विलीनीकरण होणार, 10% नोकर कपात शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये आता मुळातून बदल होत आहेत. ऑनलाइन फॅशन कंपनी मिंत्रामध्ये त्यांची सहयोगी कंपनी जबाँगचे विलीनीकरण केले जाईल. मिंत्राचे सीईओ अनंत नारायण दोन्ही कंपन्यांचे नेतृत्व करतील. मिंत्राने शुक्रवारी एका पत्रकात ही माहिती दिली.  


फ्लिपकार्टने मिंत्रास २१४ मध्ये ३० अब्ज डॉलर (आता २,१०० कोटी रु.) व मिंत्राने जबाँगला २०१६ मध्ये ७ कोटी डॉलर (५०० कोटी रु.)मध्ये खरेदी केले होते. मिंत्राच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपासून दोन्ही कंपन्यांच्या कामकाजाचे एकीकरण केले जात होते. आता उर्वरित टीमही पूर्णपणे एकीकृत केली जाईल. अनंत यांनी सांगितले की, विलीनीकरणामुळे तंत्रज्ञान, विपणन, फायनान्स व क्रिएटिव्ह विभागातील काही जणांना काढले जाऊ शकते. मात्र, हे मिंत्रा व जबाँगच्या एकूण मनुष्यबळाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. असे असले तरी दोन्ही कंपन्यांतील एकूण किती कर्मचारी असतील हे त्यांनी सांगितले नाही. सूत्रांनुसार, जबाँगमध्ये सुमारे ४०० कर्मचारी आहेत.  


मिंत्रा व जबाँग स्वतंत्र ग्राहक ब्रँडच्या धर्तीवर कायम राहतील, असे अनंत यांनी स्पष्ट केले. फ्लिपकार्ट फॅशनन, मिंत्रा व जबाँग एकमेकांच्या बाजारात हस्तक्षेप करतील याचा अनंत यांनी इन्कार केला. मोठ्या बाजारपेठेवर कब्जा करण्यासाठी स्वतंत्र ब्रँडची आवश्यकता पडते. एकमेकांच्या बाजारपेठेत हस्तक्षेपाचा विषय आल्यास आम्हाला ती बाब मान्य असेल, असे त्यांनी सांगितलेे. दोन्ही कंपन्यांचे एकीकरण गेल्या वर्षीपासून सुरू आहे. यादरम्यान काही जणांना काढले जाईल. त्यांना ३ ते ८ महिन्यांचे वेतन व नवी नोकरी शोधण्यात मदतही केली. कंपनीतून बाहेर पडल्यानंतरही त्यांना काही दिवस मेडिकल इन्शुरन्सची सुविधा मिळत राहील.

 

मिंत्राचे सीईओ अनंत नारायण कंपनीमध्ये कायम राहतील    

आपण कंपनी सोडत नसल्याचे मिंत्राचे सीईओ अनंत नारायण यांनी स्पष्ट केले आहे. बिन्नी बन्सल यांनी मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर पॅरेंट कंपनी वॉलमार्टने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले की, अनंत नारायण फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांना रिपोर्ट करतील. या निर्णयावर नाराज असलेले अनंत शुक्रवारी राजीनामा देऊ शकतात,असे प्रसारमाध्यमांमध्ये यासंदर्भात वृत्त आले होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी सांगितले की, मी इथेच आहे आणि व्यवसायाचे नेतृत्वही करीन. फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये मिंत्रा स्वतंत्र बिझनेस व्हर्टिकल म्हणून कायम राहील. त्याची टीमही स्वतंत्ररीत्या काम करेल. अनंत २०१५ मध्ये मिंत्राचे संस्थापक बन्सल यांच्या जागी त्याचे सीईओ झाले होते.  

 

मात्र, सीएफओ दीपांजन यांनी दिला राजीनामा  

सूत्रांनुसार, मिंत्राचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) दीपांजन बसू यांनी राजीनामा दिला आहे. ते २०१६ मध्ये विप्रो डिजिटल कंपनीतून उपाध्यक्षपद सोडून आले होते.  

 

मी-टू : तक्रार दडपण्याऐवजी कंपन्या तपास करत आहेत  

मी-टूच्या वाढत्या प्रकरणांनंतर कंपन्यांमध्ये लैंगिक छळाविरुद्ध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे व अशा प्रकरणांची चौकशी वाढली आहे. त्यासाठी कन्सल्टन्सी फर्म्सची मदत घेतली जात आहे. अशीच एक फर्म रेनमेकरचे सीईओ अँटनी अॅलेकस यांनी सांगितले की, २०१५ मध्ये जेव्हा मी हा विषय घेऊन आलाे तेव्हा छोट्या-मोठ्या सर्व कंपन्यांनी नकार दिला. मात्र, गेल्या ६ महिन्यांत ग्राहकांची संख्या ३० टक्के वाढली. यामध्ये देशांतर्गत व विदेशी, दोन्ही कंपन्या आहेत. त्यांना आपल्या ब्रँडच्या छबीबाबत भीती आहे. लॉ फर्म निशीथ देसाई असोसिएट्सच्या भागीदार प्रतिभा जैन यांनी सांंगितले की, लैंगिक छळाच्या तक्रारीच्या चौकशीसाठी खूप कंपन्या समोर येत आहेत. आधी अशी प्रकरणे दाबली जात होती. टॅलंट अॅडव्हायझरी फर्म हंट पार्टनर्सचे भागीदार सुरेश रैना यांनी सांगितले की, ज्या बिझनेस लीडर्सची वागणूक पूर्वी बेजबाबदारपणाची होती, ते आता या रांगेत येत आहेत.  

 

१० पेक्षा जास्त स्टाफच्या कंपन्यांना चौकशीसाठी अंतर्गत व्यवस्था आवश्यक

१० पेक्षा जास्त स्टाफच्या कंपन्यांनी लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करावी लागेल, अशी तरतूद २०१३ मध्ये आलेेल्या कायद्यात केली होती. मात्र, रेनमेकरचे सीईओ अॅलेक्स यांच्यानुसार खूप कमी कंपन्यांनी याचे पालन केले आहे. टाटा सन्सचे माजी मुख्य इथिक ऑफिसर मुकुंद राजन यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षेबाबत बहुतांश कंपन्यांचे काम वरवरचेे राहिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महिलांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवला जातो.  

बातम्या आणखी आहेत...