आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 States Have Not Even Started The Emergency Number 112, Of Which 9 Are BJP ruled, The Country On Road For The Victim, But ...

10 राज्यांनी आपत्कालीन 112 नंबर सुरूच केला नाही, यातील 9 राज्ये भाजपशासित, पीडितेसाठी देश रस्त्यावर, पण...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : हैदराबादेत बलात्कारानंतर जाळून मारण्यात आलेल्या महिला व्हेटरनरी डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी देशभर निदर्शने करण्यात आली. दुसरीकडे असे अत्याचार रोखण्याच्या कामी राज्येही गंभीर नाहीत. १० राज्यांनी महिलांसाठी असलेल्या ११२ नंबरची सेवा सुरू केलेली नाही. केंद्राने फेब्रुवारी २०१९ मध्ये वन नेशन वन इमर्जन्सी नंबर ११२' सुरू केला होता. १० पैकी ९ राज्ये भाजपशासित आहेत. एनसीआरबीनुसार या १० राज्यांत एकूण ७,२७७ बलात्काराच्या घटना घडल्या. देशातील एकूण अशा घटनांत हे प्रमाण २४% आहे. निर्भया हत्याकांडानंतर ही ११२ क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली होती.

या राज्यांत ११२ सेवा नाही


कर्नाटक, हरियाणा, बिहार, सिक्कीम, अासाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, झारखंड आणि ओडिशा

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ६ राज्यांनी निर्भया निधीतून अद्याप एक पैसाही खर्च केलेला नाही. यात कर्नाटक, झारखंड, मणिपूर, मेघालय, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

अमृतसरमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. तेलंगणा सरकारने घटनेनंतर चार दिवसांनी बलात्कार व हत्येचे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, अशी घोषणा केली आहे. सविस्तर. देश-विदेश पानावर

आता 112 इंडिया अॅपही...

अमेरिकेत महिला सुरक्षेसाठी असलेला इमर्जन्सी नंबर ९११च्या धर्तीवर भारतात ११२ हा नंबर सुरू झाला. वेगवेगळे नंबर लक्षात ठेवण्याची गरज पडू नये म्हणून हा एक नंबर सुरू करण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर ११२ इंडिया अॅप'ही सुरू करण्यात आले असले तरी १० राज्यांत ही सेवाच सुरू करण्यात आलेली नाही.
 

बातम्या आणखी आहेत...