आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजार कोटींच्या तात्काळ मदतीचे निर्देश : मुख्यमंत्री फडणवीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अवकाळी पावसामुळे राज्यात अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात आढावा घेण्यात आला. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना 10 हजार कोटींच्या तात्काळ मदतीचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नुकसानग्रस्तांना 10 हजार कोटींच्या मदतीची तरतूद करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरकारी मदतीसोबत विम्याचे वेगळे पैसे मिळतील. यासाठी विमा कंपन्यांशी बोलणार आहे. राज्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे मागणी केली जाणार आहे. मात्र त्यांची वाट न पाहता राज्यातूनच मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.