आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, अजित पवारांचा सरकारवर घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदाल झाला आहे. यातच आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. पण, ही मदत तुटपुंजी असुन किमान 25 हजार कोटींची नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधकांच्यावतीने केली आहे."सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने ज्या पद्धतीने थैमान घातलं आहे, या नुकसानीचा अंदाज घेतला तर काही कोटी एकरावर नुकसान झालेल आहे. भाजीपाला, फळबागा व पिकांना मोठा फटका बसला आहे. परिस्थिती एवढी गंभीर असताना, सरकारने घोषित केलेली 10 हजार कोटींची मदत अतिशय तुटपुंजी आहे, संपूर्ण परिस्थितीचा अंदाज न घेता केवळ थोड्याफार माहितीच्या आधारे सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पण ही मदत शेतकऱ्यांसाठी पुरेशी ठरणार नाही, त्या ऐवजी सरकारने किमान 25 हजार कोटींची मदत जाहीर करायला हवी. 10 हजार कोटी कशालाच पुरणार नाहीत, ही एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा आहे." असे मत अजित पवारांनी मांडले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...