आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मिरात आणखी १० हजार जवान पाठवले, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - केंद्र सरकारने जम्मू-काश्मिरात निमलष्करी दलाचे आणखी १० हजार जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गृह मंत्रालयानुसार दहशतवादविरोधी दल सशक्त करणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही तैनाती करण्यात येणार आहे. निमलष्करी दलाच्या १०० तुकड्या, यात ५० केंद्रीय राखीव पोलिस दल, ३० सशस्त्र सीमा दल व सीमा सुरक्षा दल व आयटीबीपीच्या प्रत्येकी १० अतिरिक्त कंपन्या असतील. दरम्यान, सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांच्या दाव्यानुसार, राज्यातील वादग्रस्त परिशिष्ट ३५ ए हटवण्याची उलटगणती सुरू झाली आहे. ते हटवल्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी जवानांची ही अधिकची कुमक पाठवण्यात येत आहे.