आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीची औषधे आणि इंजेक्शन दिल्याने 10 ते 12 रुग्ण अत्यवस्थ, अंबरनाथ येथील रुग्णालयातील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबरनाथ - थंडी आणि ताप आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना चुकीची औषधे आणि इंजेक्शन दिल्याने 10 ते 12 जणांना बाधा झाली आहे. अंबरनाथ येथील महापालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. काही रुग्णांची प्रकृती बिघडली तर काहींना रक्ताच्या उलट्या झाल्या. या सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर दोघांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

दरम्यान रुग्णांना एक्स्पायरी झालेली औषधे दिल्याचा आरोप अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी केला आहे. कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू असेही त्या म्हणाल्या. छाया रुग्णालयाच्या कारभारावर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...