आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 हजार लोकांंची तहान भागवण्यासाठी 4 तालुक्यांत 10 टँकर, 164 अधिग्रहण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यात १० टँकर सुरू करण्यात आले असून १६४ अधिग्रहण करण्यात आले आहे. यातून उस्मानाबाद, कळंब, भूम, परंडा तालुक्यातील १९ हजार ४७१ नागरिकांची तहान भागत आहे. जिल्ह्यातील विविध भागात टंचाई जाणवू लागल्याने पंचायत समितीत उपाययोजनेसाठी ग्रामपचायतीकडून प्रस्ताव दाखल होत आहेत. 

 

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने उपाययोजनेसाठी मागणी होत आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत ग्रामीण भागातील टंचाई निवारणार्थ संभाव्य टंचाई आराखडा तयार करून नियोजन केले आहे. यासाठी प्रशासनाने १५ कोटीपेक्षा अधिक निधी मंजूर केला आहे. सध्या थंडीचे प्रमाण अधिक असले तरी विहीर व कूपनलिकेला पाणी उपलब्ध नाही. परिणामी घागरभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील नगारिकांना भटकंती करावी लागत आहे. १० जानेवारी २०१९ रोजी जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील चार गावात टँकर सुरू आहेत. तसेच कळंब तालुक्यात दोन, भूम दोन, परंडा तालुक्यातील दोन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चार तालुक्यातील १०१ गावांसाठी १६४ विहीर, कूपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही गावांतील विहीरी व कूपनलिकेला पाणी उपलब्ध नसल्याने एक ते दोन घागरी पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर रांगेत थांबावे लागते. अनेकवेळा दिवसभर रांगेत थांबूनही वयोवृध्दांना विजेअभावी पाणी मिळत नाही. 

 

तालुक्यात उपाययोजना नाही 
उमरगा तालुक्यातील विहीर व कूपनलिकेला सध्या पाणी उपलब्ध आहे. यामुळे तालुक्यातील एकाही गावांत उपाययोजना सुरू करण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नाही. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

 

नागरिकांनी उपलब्ध पाण्याची बचत करावी 
कोळेवाडी व सांजा येथे प्रत्येकी एक टँकर व २४३ गावे व ३० वाडी वस्तीसाठी अधिग्रहण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याची बचत करावी. -दशरथ देवकर, अभियंता ग्रामीण पाणी पुरठा विभाग जिप. 

 

तीन तालुक्यासाठी ११ अधिग्रहण 
जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा, वाशी तालुक्यात सध्या विहीर व कूपनलिकांना पिण्यासाठी पुरेल असे पाणी उपलब्ध आहे. मात्र, काही गावांतील स्त्रोत कमी झाल्यामुळे अधिग्रहण करण्यात आले आहेत. यामध्ये तुळजापूर तालुक्यात ६ अधिग्रहण करण्यात आले आहे. लोहारा ४, वाशी तालुक्यात १ अधिग्रहण करण्यात आले आहे. 

 

पाहणी करून तत्काळ उपाययोजना सुरू करू 
गावात टंचाई निर्माण झाल्यास पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करावेत. उपाययोजनेसाठी १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंतचा संभाव्य टंचाई आराखडा मंजूर झाला आहे. -दशरथ देवकर, जिप पाणीपुरवठा अभियंता. 

 

१० गावातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा 
जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे ऑक्टोबरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली अाहे. यामुळे तहसीलदार, एसडीओंनी प्रत्यक्ष टंचाईग्रस्त भागात भेट देऊन टंचाई जाणवत असल्याने अधिग्रहण केले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव(बावी), रूई ढोकी, नांदुर्गा येथे प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. कळंब तालुक्यात शिंगोली, ताडगांव येथे प्रत्येकी एक टँकर, भूम तालुक्यातील वालवड, गिरवलीत प्रत्येकी एक टँकर, परंडा तालुक्यात कात्राबाद, कंडारी येथे प्रत्येकी एक टँकर सुरू करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...