• Home
  • 10 week old puppy in america with a tail growing his forehead

अमेरिका / डोक्यावर शेपूट घेऊन जन्मले कुत्र्याचे पिल्लू, दत्तक घेण्यासाठी लागली रांग; तीन दिवसांत आले 50 पेक्षा अधिक अर्ज 

अमेरिकेतील चॅरिटी मॅक्स मिशनने या पिल्लाला वाचवले, थंडीमुळे अस्वस्थ होते पिल्लू
 

वृत्तसंस्था

Nov 14,2019 03:29:26 PM IST

मिसोरी - अमेरिकेत एक दहा महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू चर्चेचा विषय बनला आहे. जखमी आणि थंडीने अस्वस्थ झालेल्या या पिल्लाला चॅरिटी मॅक्स मिशनने शनिवारी त्याला रेस्क्यू केले. मात्र त्याच्या डोक्यावर असलेल्या शेपटीमुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हे कुत्र्याचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी तीन दिवसांत 50 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत.

कुत्र्याच्या डोक्यावर शेपूट असल्याने मॅक्स मिशन संस्थेने याचे नाव नर्व्हहाल द लिटल मॅजिकल फरी युनिकॉर्न असे ठेवले आहे. ट्वीटरवर 'वी रेट डॉग्‍स' नावाच्या अकाउंटवर या पिल्लाचा फोटो शेअर केलेला आहे. यात लिहिले आहे की, 'नर्व्हहालने आतापर्यंत आपल्या डोक्यावर आलेले शेपूट हलवले नाही, मात्र तो याचा खूप प्रयत्न करतोय.' डोक्यावर आलेले शेपूट शरीरातील अंतर्गत अवयवाशी जोडलेले नसल्याचे सांगितले जात आहे. या शेपटीचा विशेष असा काही उपयोग देखील होत नाही. यामुळे नर्व्हहालला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. यामुळे त्याच्या डोक्यापासून हे शेपूट वेगळे करण्याची काही आवश्यकता नाही.


लसीकरणानंतर दत्तक देण्यात येणार

मॅक्स मिशनचे प्रवक्त्यांनी सांगितले की, विशेष कुत्र्यांची आवड असणाऱ्यांसाठी या कुत्र्याचा शोध घेण्यात आला आहे. हा त्याच्यासोबत आणकी एका सामान्य कुत्र्यासोबत जखमी अवस्थेत आढळला होता. मात्र आता त्याची जखम ठीक होत आहे. आतापर्यंत कुत्र्याला दत्तक घेण्यासाठी 50 पेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर आणि लसीकरणानंतर कुत्र्याला दत्तक देण्यात येणार आहे.

X
COMMENT