आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Year Girl Tortured By Her Sister And Brother In Law

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहीण आणि भाऊजीच्या छळाला कंटाळून घरातून पळून गेली मुलगी, म्हणाली ताई आणि भाऊजी खूप वाईट आहेत, मी आता घरी जाणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हजारीबाग (झारखंड) : येथील पीडब्ल्यूडी रेस्ट हाउस परिसरातील एका क्वार्टरमध्ये राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीला नातेवाईकांकडून शारिरीक आणि मानसिक छळ करण्याचे प्रकरण समोर आले आहे. छळ करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मुलीची आत्येबहीण आणि भाऊजी आहेत, या जाचाला कंटाळून घरातून पळून जाऊन तिने पोलिसांकडे मदत मागितली.

 

घरातून पळून जाऊन अधिकाऱ्यांकडे केली मदतीचे याचना

रोज होणाऱ्या मारहाणीमुळे त्रस्त झालेली नीशू घरातून निघून गेली आणि मदत मागण्यासाठी कमर्शिअल टॅक्स ऑफिसर (सीटीओ) अभिषेक पांडे यांच्याकडे गेली. यानंतर हे प्रकरण समोर आले. चौकशीदरम्यान नीशूने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. प्रकरण गंभीर असल्यामुळे सीटीओ मुलीला घेऊन कलेक्ट्रेटमध्ये गेले. तेथे डीसीसोबत भेट न झाल्यामुळे त्यांनी चाइल्ड लाइनशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली आणि त्यांच्या स्वाधीन केले. दरम्यान सीटीओंनी नीशूसाठी कपडे आणि चप्पल खरेदी करण्यसाठी काही पैसे देऊ केले. चाइल्ड लाइनने नीशूला आपल्या ताब्यात घेऊऩ पुढील कारवाई सुरु केली आहे. 

 

मुलीला जेवायला देत नव्हते बहीण आणि भाऊजी

नीशू मुळतः बिहारच्या जहानाबाद येथील रहिवासीआहे. तिची आई घर सोडून गेलेली आहे. घरी फक्त वडील आणि भाऊ आहे. गेल्या चार वर्षापासून हजारीबाग येथे आपल्या आत्ये बहीण वीणाकडे राहत होती. तिचे भाऊजी नागमणी पीडब्ल्यूडीमध्ये नोकरीला आहेत. ती घरी आल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तिला मारहाण करण्यात येत होती. तिथी अवस्था पाहूनही त्यांना दया येत नव्हदी. तिच्याकडून घरातील सर्व काम करून घेत होते आणि तिला पोटभर जेवणही देत नव्हते. मंगळवारी सकाळी तिला मारहाण केली होती. बहिणीकडून होणाऱ्या त्रासाचा अतिरेक झाल्यामुळे ती घरातून निघून गेली. आता कधीही घरी न जाणार नसल्याचे तिने सांगितले आहे.