आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षीय चिमुरड्याला झाडाला बांधून केले निर्वस्त्र, मग अंगावर टाकला साखरेचा गरम पाक, Video आला समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - बिहारच्या फुलवारी शरीफमध्ये एका 10 वर्षीय बालकासोबत जमावाने केलेल्या दुष्कृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  जमावाने मोबाइल चोरीच्या आरोपावरून बालकाला झाडाला बांधून बेल्ट आणि दांडक्याने मारहाण केली. एवढे करूनही मन भरले नाही म्हणून त्याने त्याचे कपडे उतरवून त्याच्या अंगावर साखरेचा गरम-गरम पाक टाकला. यानंतर गर्दीने त्याला झाडाखाली सोडले, जेणेकरून त्याच्या अंगाला मुंग्या चावतील. चिमुरडा जमावापुढे दयेची भीक मागत होता, परंतु त्याची मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. तब्बल 3 तास जमाव चिमुरड्याला टॉर्चर करत होता. पोलिसांना माहिती मिळताच चिमुरड्याची सुटका करण्यात आली.

 

शुक्रवार रात्री अधपा मोहल्ल्यातील रहिवासी नूर आलम यांच्या घरातून मोबाइल चोरीस गेला होता. संशयाच्या आधारे गल्लीत फिरत असलेल्या अल्पवयीन मुलाला लोकांनी पकडले. मग दोरीने बांधून छळ केला. पोलिसांनी नूर आलम आणि त्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे, तर चिमुरड्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. फुलवारी शरीफचे DSP रमाकांत प्रसाद म्हणाले- हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे. जमावात सामील असलेल्या समाजकंटकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

 

बातम्या आणखी आहेत...