आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Years Of Paa: Abhishek Bachchan, Who Did Not Want To Be Acting In The Film, Thanked Father Amitabh In The Open Letter

चित्रपटात अभिनय करु इच्छित नव्हता अभिषेक बच्चन, ओपन लेटरमध्ये अमिताभ बच्चन यांचे मानले आभार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन स्टारर 'पा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला दहा वर्षे पूर्ण झाली आहे. आर. बाल्की दिग्दर्शित हा चित्रपट 4 डिसेंबर 2009 रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक ओपन लेटर लिहिले आहे. यामध्ये त्याने दिग्दर्शक आर. बाल्की यांच्यासह चित्रपटाशी निगडीत प्रत्येकाचे आभार व्यक्त केले आहे.  हा चित्रपट अभिषेकची पहिली निर्मिती आहे. वडील अमिताभ बच्चन यांचेही त्याने विशेष आभार मानले आहेत. चित्रपटात अभिषेकने त्याचे वडील अमिताभ  बच्चनच्या वडिलांची भूमिका वठवली होती. हे ओपन लेटर लिहिताना अभिषेक भावूक झाल्याचे दिसून येते.  

  • अभिषेकचे ओपन लेटर...

“पा चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं होतं. दिग्दर्शक आर. बाल्की यांनी विश्वास दाखवला नसता तर कदाचित हा चित्रपट झाला नसता. परंतु मला या चित्रपटात काम करायचं नव्हतं. ( मी माझ्या भूमिकेबाबत साशंक होतो) त्यावेळी मी आणि बाल्की एकत्र एका जाहिरातीचं चित्रीकरण करत होतो. तेव्हा दिवसभर त्यांनी माझी समजूत काढली होती. त्यानंतर हा चित्रपट करण्यास मी तयार झालो. हा अनुभव फार मजेशीर आणि कायम आठवणीत राहण्यासारखा आहे. या प्रवासात त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं त्याची परतफेड मी कधीच करु शकणार नाही. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि हो या चित्रपटाचा मला प्रचंड गर्व आहे. या चित्रपटाचे विंग कमांडर रमेश पुलापका (आमचे सीईओ), सुनील मनचंदा (माझे प्रॉडक्शन पार्टनर) आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंटची मदत, मार्गदर्शन आणि विश्वासाशिवाय या चित्रपटाची निर्मिती करणे शक्य नव्हते. हे सर्व या चित्रपटाचा कणा आहेत. अमेझिंग क्रू मेंबर्स... ग्रेट पीसी सर आणि राजा सर यांच्यासोबतची ही सुरुवात... अनिल नायडू, सुनीब बाबू, आमची अमेझिंग मेकअप टीम, अमेझिंग एडी हितेंद्र घोष, कॉश्च्युम टीम आणि इतर युनिट... माझ्या ऑरोसाठी... माझे पा (अमिताभ बच्चन)... सर्वप्रथम वडिलांची भूमिका साकारण्यासाठी आपल्या मुलावर विश्वास दाखवला आणि या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी परवानगी दिली..   विद्या (बालन), अरुंधती (नाग), परेश जी (रावल) आणि चित्रपटाच्या संपूर्ण कास्टने पाठिंबा दिला. मी सगळ्यांचे आभार मानतो (कारण मी तुमच्या चेक्सवर स्वाक्षरी केली आहे.) आणि शेवटी हा चित्रपट बघण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आभार. मी कायम ऋणी राहील. ”,  अशी पोस्ट अभिषेकने इन्स्टाग्रामवर शेअर केली.

  • प्रोजेरियाने पीडित 12 वर्षांच्या मुलाची कहाणी 'पा'

या चित्रपटाची कथा ऑरो नावाच्या 12 वर्षांच्या मुलाची आहे. हा मुलगा प्रोजरिया नावाच्या एका दुर्लभ अनुवांशिक आजाराने ग्रस्त असतो. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ऑरो हे पात्र साकारलं असून अभिषेक बच्चनने आरोच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री विद्या बालनने ऑरोच्या आईची भूमिका वठवली होती. 

बातम्या आणखी आहेत...