आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरासाठी १०० काेटींचा निधी मंजूर; नगरविकासचे पत्र प्राप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील मुलभूत विकास कामांसाठी १०० काेटींचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे. रविवारी दुपारी मुंबईत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीला मंजुरी दिली. यासंदर्भात नगरविकास विभागामार्फत निधी मंजुरीचे पत्र प्राप्त झाले अाहे, अशी माहिती महापालिका अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी साेमवारी 'दिव्य मराठी'शी बाेलताना दिली. 


महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला एकहाती सत्ता द्या, वर्षभरात शहराचा कायापालट करण्याची घाेषणा प्रचार सभांमध्ये करण्यात अाली हाेती. त्यानंतर शासन पातळीवर बैठकांचा सपाटा सुरू झाला अाहे. मनपा अायुक्त चंद्रकांत डांगे यांना तातडीने मुंबईला बाेलावून घेण्यात अाले हाेते. रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अायुक्त डांगे यांची बैठक झाली. यात शहरातील विकास कामांसाठी १०० काेटींच्या निधीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. त्यानुसार नगरविकास विभागामार्फत अायुक्त डांगे यांना निधी मंजुरीचे पत्र प्राप्त झाले. मंत्री गिरीश महाजनांनी दिलेल्या अाश्वासनानुसार निधी मंजुरीचा निर्णय म्हणजे विकासाचे नवे पर्व सुरू हाेत असल्याचे पहिले पाऊल मानले जात अाहे. 


गाळेप्रश्नी कायदेशीर सल्ला घेणार 
गाळेप्रकरणी शासनाने नुकतीच कायद्यात तरतूद केली अाहे. परंतु, उच्च न्यायालय व सर्वाेच्च न्यायालयाचे अादेश असल्याने जळगावातील गाळेधारकांना कितपत लाभ मिळेल? हा प्रश्न अाहे. मंुबईतील बैठकीत गाळेप्रश्नी चर्चा करण्यात अाली. त्यात कायदेशीर बाजू तपासून पालिका व गाळेधारकांना फायदा हाेईल असा सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला जाणार अाहे. हुडकाेच्या कर्जप्रकरणी डीअारएटी व डीअारटी काेर्टात बाजू मांडताना शासनाच्यावतीने कायदेशीर मदत करण्याचे अाश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त जागी लवकरच राजपत्रीत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार अाहे. दरम्यान साेमवारी अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी त्रयस्थ सेवाभावी संस्थांमार्फत केलेल्या पाहणीतील अादर्श मतदान केंद्रांचा अहवाल राज्य निवडणूक अायाेगाला सादर करण्यात अाला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...