• Home
  • Business
  • 100 Days of Modi Government| India Stock Investors Lost Rs 12.5 Lakh Crore

शेअर बाजार / मोदी सरकार 2: 100 दिवसांच्या कार्यकाळात गुंतवणुकदारांचे 12.5 लाख कोटी रुपये बुडाले

परदेशी गुंतवणुकदारांनी 100 दिवसांत 31 हजार 700 कोटी रुपये काढून घेतले
 

Sep 17,2019 02:39:01 PM IST

मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना 12.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 30 मे रोजी मोदी सरकार 2चा कार्यकाळ सुरु झाला. या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( बीएसई)वर लिस्टेड कंपन्यांचे कॅपिटलायझेशन 153 लाख 62 हजार 936 कोटी रुपये होता. आता तो 141 लाख 15 हजार 316 कोटी रुपये इतका राहिला आहे. विदेशी गुंतवणुकदारांची विक्री यातील एक मुख्य मानले जात आहे.


परदेशी गुंतवणुकदारांनी 100 दिवसांत 31 हजार 700 कोटी रुपये काढून घेतले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या बजेटमध्ये सुपर-रिचवर टॅक्स वाढवण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत परदेशी गुंतवणुकदारांचा (एफपीआय) देखील विचार करण्यात आला होता. यामुळे एफपीआयने आपली विक्री वाढवली होती. पण बाजारातील होणार घसरण पाहून सरकारने मागील महिन्यात एफपीआयवक सरचार्ज वाढवण्याचा निर्णय मागे घेतला. मात्र याचा बाजाराला फारसा फायदा झाला नाही.


मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत विदेशी गुंतवणुकदारांनी 31 हजार 700 कोटी रुपयांची विक्री केली आहे. या काळात एनएसईवरील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकात 26% घट झाली. सरकारच्या पहिल्या 100 दिवसांत आयटी निर्देशांक वगळता उर्वरित 10 निर्देशांकांचे नुकसान झाले.


मोदी सरकार येणाच्या आशेवर 83 हजार कोटींची केली होती गुंतवणूक
पुन्हा मोदी सरकार येणार या आशेवर परदेशी गुंतवणुकदारांनी फेब्रुवारी ते मे महिन्यात शेअर बाजारात 83 हजार कोटी रुपये गुंतवले होते. पण बर्‍याच मोठ्या कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल , ऑटो सेक्टरमधील मंदी, जागतिक व्यापार युद्ध आणि इतर आंतरराष्ट्रीय कारणांमुळे शेअर बाजारात घट झाली.


X