आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

76 वर्षांचे अमिताभ बच्चन करतात आपल्यापेक्षा 23 वर्ष लहान आमिर खान याच्याइतकीच कमाई, शाहरुखपेक्षाही दीड पट जास्त असते त्यांची कमाई, बॉलिवूडमध्ये फक्त चार कलाकार आहेत त्यांच्या पुढे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन यांचे वय जरी 76 वर्ष असले तरी ते कमाई मात्र त्यांच्यापेक्षा 23 वर्षांनी लहान असणाऱ्या अामिर खान एवढीच करतात. एवढेच नाही तर त्यांची कमाई शाहरुख खानच्या कमाईच्या दीड पट जास्त असते. ट्रेड मॅगझीनने ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात भारातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 100 लोकांची यादी प्रकाशित केली आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन सातव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांची कमाई 96.17 कोटी एवढी आहे. त्याचबरोबर 53 वर्षांच्या अामिर खानची कमाईदेखील त्यादरम्यानच आहे. त्याची कमाई 97.5 एवढी आहे आणि यादीमध्ये ते  सहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीत 53 वर्षांच्याच शाहरुख खानचा देखील समावेश आहे. त्याची कमाई 56 कोटी असून ते या यादीत टॉप 10 च्या बाहेर 13 व्या क्रमांकावर आहेत. बॉलिवूडमधील सलमान खान (253.25 कोटी रुपये), अक्षय कुमार (185 कोटी रुपये), दीपक पदुकोण (112.8 कोटी रुपये) आणि अामिर खान हे सर्व अमिताभ बच्चन यांच्या पुढे आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा बिग बीच्या कमाईचे स्त्रोत

 

बातम्या आणखी आहेत...