आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 100 Year Old Turtle Weighing 80 Kg Became Father Of 800 Children, Saved Entire Species

100 वर्षीय कासवाने दिला 800 पिल्लांना जन्म, लुप्त होत असलेल्या आपल्या प्रजातीला केले पुनर्जिवीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
100 वर्षीय डिएगो - Divya Marathi
100 वर्षीय डिएगो
  • चेलोनोएडिस हूडेनसिस नावाची कासवांची प्रजाती लुप्त होणाच्या मार्गावर होती

कॅलिफोर्निया- 80 किलो वजनाच्या आणि 100 वर्षीय एका कासवाने लुप्त होत असलेल्या आपल्या प्रजातीला पुनर्जिवीत केले आहे. डिएगो नावाच्या या कासवाने एक-दोन नाही तर तब्बल 800 कासवांना जन्म दिला.


डिएगो चेलोनोएडिस हूडेनसिस नावाच्या प्रजातीचा कासव आहे. 50 वर्षांपूर्वी या प्रजातीचे फक्त 2 मेल आणि 12 फीमेल जिवंत होते. गालापोगास आयलँडवर हे इतक्या मोठ्या परिसरात राहत होते की, यांची संख्या वाढण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे 1965 मध्ये डिएगोला आणि इतर 14 कासवांना कॅप्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम अंतर्गत दक्षिण कॅलिफोर्नियामधील सांता क्रूज आयलँडवरील प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. येथे डिएगोला 12 फीमेल कासवांसोबत ठेवण्यात आले.

गालापोगास आयलँडवर 40% संख्या वाढली

पार्कच्या रेंजरने सांगितले की, या दरम्यान कासवांची संख्या 2000 वर गेली आणि यात फक्त डिएगोनेच 800 कासवांना जन्म दिला. 5 दशकापर्यंत आपल्या प्रजातीला लुप्त होण्यापासून वाचवणाऱ्या डिएगोला यावर्षी मार्चमध्ये सेवानिवृत्त केले जात आहे. त्यानंतर याला परत आपल्या घरी म्हणजेच गालापोगास आयलँडवर पाठवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...