• Home
  • 100 year old woman died, an hour after 104 year old husband died, TamilNadu’s Pudukkottai

तमिळनाडू / एक तासांच्या अंतरात 104 वर्षीय पती आणि 100 वर्षीय पत्नीचा मृत्यू

  • पती-पत्नी तमिळनाडूच्या पुदुकोट्टाई जिल्ह्यातील कुप्पाक्कुडीचे रहिवासी होते
  • ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या पतीला पाहून बेशुद्ध झाली पत्नी, परत उठलीच नाही

दिव्य मराठी वेब टीम

Nov 13,2019 06:13:57 PM IST

पुदुकोट्टाई- तमिळनाडूच्या पुदुकोट्टाई जिल्ह्यात सोमवारी 104 वर्षीय वेत्रिवेल यांच्या मृत्यूच्या एका तासात त्यांची 100 वर्षीय पत्नी पिचायी यांचाही मृत्यू झाला. हे दांपत्य अलंगुडी तालुक्यातील कुप्पाक्कुडी आदि द्रविड कॉलनीत राहत होते. त्या दोघांचे लग्न 75 वर्षांपूर्वी झाले होते. आपल्या चांगल्या प्रकृतीमुळे ते दोघे नेहमीच चर्चेत असायचे.


वेत्रिवेल यांना सोमवारी रात्री छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यांचे नातू त्यांना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीचा मृतदेह पाहून पिचायी यांना रडू कोसळले आणि त्या बेशुद्ध झाल्या, त्यानंतर त्या उठल्याच नाहीत.

X
COMMENT