आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता(पश्चिम बंगाल)- येथे मंगळवारी रात्री बाइक वरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या केली. घटना राजधानी कोलकाताच्या दमदम परिसरात घडली. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले निर्मल कुंडु तृणमूलचे वार्ड अध्यक्ष होते. याच दिवशी दमदम पोस्ट ऑफिसमधून तृणमूल कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जय बंगाल, जय हिंद आणि वंदे मातरम् लिहीलेले 10 हजार पोस्ट कार्ड पाठवले.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल कार्यकर्त्यांनी मोदींना 10 लाख कार्ड पाठवले आहेत. यांना दमदम पोस्ट ऑफिसमधून दिल्लीच्या 7, लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या पत्यावर पोस्ट केले आहे. दक्षिण दमदम नगराचे अध्यक्ष डी. बनर्जी यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षात आपली ताकद दाखवली होती. दुसरीकडे, भाजपनेदेखील मुख्यमंत्री आणि तृणमूल सुप्रीमो ममता बनर्जींना जय श्रीराम लिहीलेले 10 लाख कार्ड पाठवण्याची तयारी केली आहे.
बर्दवानमध्ये भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये बाचा-बाची
यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी बर्दवानमध्ये भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये बाचा-बाची झाली होती. त्यावेळी अनेक घरे आणि दुकानात जाळपोळदेखील करण्यात आली होती. असे सांगितले जात आहे की, निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर भाजपचे कार्यकर्ते मिठाई देत होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचा-बाची झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.