आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

108 रुग्णवाहिका डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कुचकामी; आदिवासी हैराण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निलेश पाटील 

नवापूर - गोरगरीब रुग्णांसह अपघातातील गंभीर जखमींना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून सुरू करण्यात आलेली 108 रुग्णवाहिका डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे नवापूर आदिवासी बहूल तालुक्यात कुचकामी ठरत आहे.

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास एका बालकांची परिस्थिती नाजूक असल्याने त्याला नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नातेवाइकांनी 108 रुग्णवाहिकेची मदतही मागितली; परंतु डॉक्टरांअभावी नवापूर येथून रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. शेवटी 25 किलोमीटर अंतरावरून विसरवाडीहून उशीराने 108 उपलब्ध झाली. त्या बालकाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. नवापूर रुग्णालयात बालरोग तज्ञ सह अनेक डॉक्टरांची पदे रिक्त आहे. आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहे. लोकप्रतिनिधी देखील उदासीन आहे. 

नवापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग याच गावातून जातो. वाहनांची मोठी वर्दळ असल्याने या मार्गावर नवापूर परिसरात अपघातांच्या घटना वारंवार घडतात. या अपघातातील गंभीर जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करता यावेत यासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिकाही उपलब्ध आहे; परंतु गेल्या महिन्यांपासून या रुग्णवाहिकेवर रात्रपाळीसाठी डॉक्टरच नाही. त्याचा फटका गंभीर आजारी गोरगरीब रुग्णांसह अपघातातील जखमींना बसून, त्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे दिसत आहे.खांडबारा, विसरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील दिवसात 108 रुग्णवाहिकेची सेवा विस्कळीत आहे. असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

हा प्रकार वारंवार घडत असतानाही रात्रीच्या वेळी रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध करण्यात येत नसल्याने परिसरातील नागरिकांना मध्ये रोषाचे वातावरण आहे. यासंदर्भात आमदार शिरिषकुमार नाईक उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना योग्य उपाययोजना करण्याचा सुचना केल्या.

बातम्या आणखी आहेत...