आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- 30 जुलै 2018 ला मराठा आंदोलनादरम्यान पुण्यातील चाकणमध्ये झालेल्या हिंसक आदोलनादरम्यान चाकण पोलिस स्टेशनवरही आंदोलकांनी हल्ला केला होता. यात अनेक पोलिस कर्मचारी घखमी झाले होते. आता या प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी 108 जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आरके पद्मनाभन यांनी गुरुवारी दिली.
बहुतेक आरोपी राजकारण्यांच्या जवळचे
चाकणमध्ये झालेल्या हिंसेसाठी जवळपास दोन हजार लोकांची चौकशी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या 108 जणांना ताब्यातही घेण्यात आले. त्योसोबतच इतर 15 जणांची चौकशी सुरू आहे. अटक केलेले आणि चौकशी सुरू असलेले बहुतेक लोक राजकारण्यांच्या जवळचे आहेत. तसेच चाकण हिंसाचार आणि पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्याची वेगळे चौकशी केली जात आहे. हिंसा आणि तोडफोडीत ज्यांची चौकशी केली जात आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेंचाही समावेश आहे. तसेच पोलिस स्टेशवर झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ, ऑडियो, फोटो आणि इतर पुराव्यांवरुन कारवाई केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.