आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे झाला खुलासा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पलवल(हरियाणा)- येथील होडल परिसरातील 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातील 2 आरोपींनी बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

पलवलच्या होडल परिसरात शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहीक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवून तो सोशल मीडीयावर व्हायरल केला. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत याची तक्रार दिली त्यांनी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

 

पलवलच्या महिला पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली की, त्यांची 14 वर्षांची मुलगी आहे. मागच्या 12 जैलैला दुपारी मुलगी शाळेतून घरी येत होती तेव्हा मर्रोली गावातील लोकेश आणि कल्लूने तिला उचलून नेले आणि एका निर्जणस्थळी नेऊन तिच्यावर लोकेशने बलात्कार केला, आणि कल्लूने त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर कल्लूनेही तिच्यावर बलात्कार केला आणि कोणाला सांगितलेस तर व्हिडिओ व्हायरल करायची धमकी दिली. या घटनेच्या काही महिन्यानंतर त्यांनी परत तिला उचलून नेले आणि त्याच ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.


पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या घरच्यांना कळाले की, मुलगी आजकाल खुप शांत राहत आहे. वडिलांनी कारण विचारल्यावर ती व्हिडीओ व्हायरल होईल या भितीने काहीच सांगु शकली नाही. काही दिवसानंतर वडिलांनी त्यांच्या भाच्च्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाहिला त्यात त्यांच्यामुलीवर आरोपी बलात्कार करत असल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी पोलिसांत याची तक्रार दाखल केली.

 

पोलिसांनी मुलीची मेडीकल तपासणी केली ज्यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.