आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांपासून 16 वर्षीय मुलीची बापच लुटत होता अब्रू, बाहेरच्या 19 जणांनीही केला रेप, घरात कुणालाच नव्हता याचा पत्ता...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुन्नूर - केरळात 16 वर्षीय मुलीवर रेप झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 2 वर्षांपासून मुलीचा बापच तिच्यावर रेप करत होता. एवढेच नाही, या वर्षांमध्ये इतर अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी तिच्या बापासकट 5 जणांना अटक केली आहे. मुलीने जेव्हा आपल्या भावाला शोषणाची पूर्ण कहाणी सांगितली तेव्हा तिच्या आईला सर्व प्रकार कळला. तेव्हा कुठे या लैंगिक अत्याचारांना वाचा फुटली.  

 

बापच करत होता रेप
- पोलिसांनी सांगितले की, कुन्नूरमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीवर मागच्या दोन वर्षांपासून जन्मदाता बापच रेप करत होता. मुलीने पोलिसांना सांगितले की, बापाशिवाय इतर बाहेरच्या लोकांनीही तिचे शोषण केले.
- पोलिस अधिकारी वेणुगोपाल म्हणाले की, मुलीने फक्त दोघांची नावे सांगितली होती. यानंतर मोबाइल टॉवर लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे 19 जणांना याप्रकरणी संशयित बनवण्यात आले आहे.
- पोलिसांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्येही 4 जणांनी या मुलीवर बलात्कार केला होता, ज्यापैकी एकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी मैत्री केली होती. तर इतर तिघे तिचे मित्र होते.
- पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर बापासकट या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय इतर 7 जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एक राजकीय पक्षाशी संबंधित आहे.

 

असा झाला प्रकरणाचा खुलासा
- पीडित मुलीकडून तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीने ही बाब आपल्या भावाला सांगितली होती, त्याने दुसऱ्या बहिणीच्या माध्यमातून आईपर्यंत हे सर्व कळवले.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाऊ म्हणाला की, त्याच्या बहिणीचा एक अश्लील व्हिडिओ दाखवून त्यालाही ब्लॅकमेल करण्यात येत होते. दुसरीकडे, मुलीने शेजारच्या आणखी काही मुलींनाही हे सर्व भोगावे लागल्याचे सांगितले आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...