आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या मुलाने मित्रांमध्ये वाटले 46 लाख रुपये; मजूर मित्राला दिले 15 लाख, GF ला सोन्याची अंगठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर - मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरात 10 वीच्या एका विद्यार्थ्याने फ्रेंडशिप डे काही असा सेलिब्रेट केला की आपल्याला विश्वास बसणार नाही. त्याने आपल्या मित्रांवर फुशारकी दाखवण्यासाठी मित्र मंडळी आणि गर्लफ्रेंडवर तब्बल 46 लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. त्याच्या वडिलांनी घराच्या अलमारीत 60 लाख रुपये रोख ठेवले होते. त्यातून या मुलाने 46 लाख रुपये उचलले. वडीलांनी बँकेत पैसे जमा करण्यासाठी जेव्हा अलमारी उघडली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. त्याने हा सगळा खर्च फ्रेंडशिप डे निमित्त केला होता.


मजूर मित्राला दिले 15 लाख रुपये
> शहरातील एका शाळेत अवघ्या 10 वीला असलेल्या या मुलाचा एक मित्र मजूर होता. त्याने त्या मजूर मित्राला दिलखुलासपणे 15 लाख रुपये रोख दिले. सोबतच, नेहमी आपले होमवर्क करून देणाऱ्या एका वर्गमित्राला त्याने 3 लाख रुपये गिफ्ट रॅप करून दिले. 
> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचे वडील बिल्डर आहेत. शुक्ला कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीच एक घर विकले होते. त्याच घरातून त्यांना 60 लाख रुपये मिळाले होते. हे पैसे आपल्या वडिलांनी अलमारीत ठेवल्याची माहिती त्या मुलाला होती. 
> विद्यार्थ्याने मोठ्या फुशारकीने आपल्या मित्रांना ही गोष्ट सांगितला. यावर त्याच्या मित्रांनी पार्टीचा हट्ट धरला. सुरुवातीला त्याने आपल्या वडिलांच्या अलमारीतून 2 लाख रुपये काढले आणि मित्रांना जंगी पार्टी दिली. यानंतर 44 लाख रुपये काढले आणि मित्रांमध्ये वाटून दिले. एवढेच नव्हे, तर आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवशी शान म्हणून तिला सोन्याची अंगठी गिफ्ट केली होती अशी कबुली त्या मुलाने दिली. 


बहुतांश पैश्यांची रिकव्हरी
वडिलांनी पैसे बँकेत जमा करण्यासाठी जेव्हा अलमारी उघडली तेव्हा पैसे गायब होते. त्यांनी वेळीच पोलिसांना फोन करून तक्रार दाखल केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सुरुवातीला नोकरांची चौकशी केली. यानंतर बिल्डरच्या मुलावर संशय आला. पोलिसांनी त्याला विचारले असता आपणच ही रक्कम 5 मित्रांमध्ये वाटून दिली अशी कबुली त्या मुलाने दिली. पोलिसांनी त्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांसह पोलिस स्टेशनला बोलावले. यानंतर वाटलेली बहुतांश रक्कम वसूल करण्यात आली. दरम्यान तो विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांच्या पालकांनी कुणावरही खटला दाखल केला नाही. आपसात चर्चेनंतर तक्रारही परत घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...