Home | National | Other State | 11 Criminal cases filed against Azam Khan for using bad language

जयांवर असभ्य टिप्पणी, आझम यांच्यावर गुन्हा; १४ दिवसांत ९ गुन्हे

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 16, 2019, 07:50 AM IST

एका व्हिडिओत ते म्हणत आहेत की, निवडणूक जिंकल्यानंतर सर्व हिशेब पूर्ण करू.

  • 11 Criminal cases filed against Azam Khan for using bad language

    लखनऊ- सपचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध जयाप्रदांवर असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला. महिला आयोगाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. आझम खान यांनी जयाप्रदांवर केलेल्या टिप्पणीवर माफी मागण्याऐवजी माध्यमांवरच प्रकरण तापवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘मी कोणाचेही नाव घेतले नाही. मी कोणाचे नाव घेतल्याचे सिद्ध केल्यास मी निवडणूक लढवणार नाही’. आझम यांच्यावर १४ दिवसांत वेगवेगळ्या ठाण्यांत ९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ८ गुन्हे आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल आहेत. मागील लोकसभा निवडणुकीतही त्यांच्यावर चिथावणीखोर, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे ७ गुन्हे आहेत. आयोगाच्या यादीतही त्यांच्यावर ७ तक्रारींची नोंद आहे.


    आता म्हटले- लोकांनी कलेक्टरला घाबरू नये, त्याच कलेक्टरकडून मायावतींचे बूट स्वच्छ करून घेऊ...
    आझम खान यांचे हे वक्तव्य सोमवारी समोर आले. एका व्हिडिओत ते म्हणत आहेत की, निवडणूक जिंकल्यानंतर सर्व हिशेब पूर्ण करू.

Trending