आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलच्या बारमध्ये मध्यरात्रीनंतर बेछूट गोळीबार, 6 महिलांसह 11 जणांचा मृत्यू; हल्लेखोरांपैकी एकास अटक, 7 जण फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियो - ब्राझीलच्या एका बारमध्ये रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीनंतर बेछूट गोळीबार झाला. येथील स्थानिक वेळेनुसार, पहाटे 3.30 वाजता सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये 6 महिलांसह एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. सोबतच, एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळ एका हल्लेखोराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बाइक आणि कारमध्ये आले होते. एकूणच 7 हल्लेखोरांपैकी एकास अटक करण्यात आली तर, 6 जण पसार झाले. अटकेत असलेल्या हल्लेखोराची सध्या कसून चौकशी केली जात आहे.


या हल्ल्याने अख्ख्या राजधानीची झोप उडवली. हल्ल्यानंतर बार आणि परिसरात मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली. यातील अनेक जण आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी आले होते. ब्राझीलच्या निमलष्करी दलाच्या प्रवक्त्या नतालिया मेलो यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्याची कसून चौकशी केली जात आहे. सद्यस्थितीला या हल्ल्यास दहशतवादी हल्ला म्हणता येणार नाही. परंतु, हा एक नरसंहार आवश्य आहे. बारमध्ये उपस्थित राहिलेल्या लोकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यामध्ये सर्वत्र फक्त रक्त दिसून येत आहे.