आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 11 Feet Long Tiger Shark Got 2 Hands And 1 Bracelet Of Human From Stomach, They Were Less Than 48 Hours Old

11 फूट लांब टायगर शार्कच्या पोटात आढळले मानवाचे 2 हाथ आणि 1 ब्रेसलेट, फक्त 48 तासांपूर्वीचे असल्याचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशोधनासाठी फ्रांसीसी बेट 'ला रीयूनियन'च्या किनाऱ्यावरुन शुक्रवारी या शार्कला पकडले होते

पॅरिस- फ्रांसीसी बेट 'ला रीयूनियन'च्या किनाऱ्यावर शुक्रवारी पकडलेल्या 11 फूट (3.4 मीटर) लांब टायगर शार्कच्या पोटातून 2 मानवी हात आणि एक ब्रेसलेट मिळाले आहे. शार्क कॅचिंग प्रोग्रामच्या संशोधनानुसार, मानवी अवशेषला पाहिल्यानंतर कळाले की, हे हात फक्त 48 तासांपूर्वीचेच आहेत. डिसेंबरमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ब्रेसलेटला ओळखले आहे. पण, त्या व्यक्तीचा मृत्यू बुडून झाला का शार्क अटॅकने झाला हे अद्याप स्पष्ट नाहीये. ला रीयूनियन किनाऱ्यावर झालेल्या शॉर्क हल्ल्यांना पाहता स्थानिक प्रशासनाने 2013 पासून सर्फिंगसारखे प्रकार बंद केले आहे.मानवांवर शार्क हल्ल्यांना थांबवण्यासाठी केल्या जाणाऱ्या शोधामधून आलेल्या आकड्यानुसार मागील 9 वर्षात फक्त हिंद महासागरात 24 शार्क अटॅक झाले आहेत. यातील 11 हल्ले खूप घातक होते. या वर्षी एका व्यक्तीचा मृत्यू शार्कमुळे झाला आहे. बहुतेक मच्छीमार किंवा सर्फर शार्कचे शिकार असतात.

शार्कच्या पोटातून सापडलेल्या हातात वेडींग रिंग मिळाली

नोव्हेंबरमध्ये एका शार्कच्या पोटातून एक हात सापडला होता. हा व्यक्ती स्नॉर्कलिंग लॅगूनच्या दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्या व्यक्तीच्या पत्नीने हातातील वेडींग रिंग पाहून त्या व्यक्तीची ओळख पटवली.

बातम्या आणखी आहेत...