Home | National | Other State | 11 Killed After Bus Falls Into Gorge In Kashmir

Accident: काश्मीरात भीषण बस अपघात, दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 11:45 AM IST

राजधानीपासून 175 किमी दूर हा अपघात घडला.

  • 11 Killed After Bus Falls Into Gorge In Kashmir

    श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात किमान 11 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हायवेवरून प्रवाशांनी भरलेली बस घसरून खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत अनेक जण जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस लोरान ते पूंछच्या दिशेने जात होती. राजधानीपासून 175 किमी दूर हा अपघात घडला.

    घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, पूंछ जिल्ह्याच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये 19 जण प्रवास करत होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरीत सर्व जखमींना उपचारासाठी मंडी येथील रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पूंछ येथील जिल्हा रुगणालयात उपचारासाठी पाठवले जात आहे. हा अपघात नेमका कसा घडला हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु, हायवेवर नागमोडी रस्त्यावरून जाताना टायर घसरला आणि बस खोल दरीत कोसळली असे सांगितले जात आहे.

Trending