आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या ज्यू प्रार्थनास्थळावर माथेफिरूने केला अंदाधुंद गोळीबार, 11 जण ठार, 6 पेक्षा जास्त जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीट्सबर्ग- अमेरिकेच्या पीट्सबर्गमध्ये एका बंदुकधाऱ्याने ज्यूंच्या प्रार्थनास्थळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 11 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या फायरिंगमध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांसहित अनेक जखमी झाले आहेत.

 

असा झाला हल्ला

हा हल्ला पिट्सबर्गच्या स्किवरेल हिलमधील ट्री ऑफ लाइफ सिनगॉगमध्ये झाला आहे. पोलिसांच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत जखमी झाल्यानंतर हल्लेखोर रॉबर्ट बोवर्स (46) ने आत्मसमर्पण केले आहे. जखमी झाल्याने माथेफिरूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

 

हल्लेखोर म्हणाला- सर्व ज्यूंनी मेले पाहिजे...

एफबीआयने या घटनेला हेट क्राइम मानून चौकशी सुरू केली आहे. फायरिंग करण्याआधी हल्लेखोर कथितरीत्या भवनात घुसला आणि ओरडून म्हणाला की, 'सर्व ज्यूंनी मेले पाहिजे.'

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अतिशय दु:खद घटना असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, पीट्सबर्गमध्ये वाटले त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आहे. हल्ल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, असे अपराध करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंड दिला जावा.

 

मृत्युदंडाची शिक्षा?

अमेरिकेच्या न्याय विभागाने हल्लेखोरावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. अटॉर्नी जनरल म्हणाले की, धर्माच्या नावावर द्वेष आणि हिंसेला आमच्या समाजात कोणतेही स्थान नाहीये. ते म्हणाले की, आरोपीविरुद्ध हेट क्राइमसहित इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल. जेणेकरून त्याची मृत्युदंडाची शिक्षा सुनिश्चित होऊ शकेल.

 

इस्रायलच्या पीएमने केली निंदा

ज्यू राष्ट्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घटनेनंतर अमेरिकेसोबत एकजूट 

दाखवत एका व्हिडिओ संदेशात म्हटले की, पीट्सबर्गच्या सिनगॉगमध्ये झालेल्या अमानुष हल्ल्याने मी खूप दु:खी झालो आहे. हा मोठा धक्का आहे.

 

बातम्या आणखी आहेत...