आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींसह ११ नेत्यांना श्रीनगरमधून परत पाठवले; हा विरोधी पक्षांच्या अधिकारांवर घाला : माकपचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ श्रीनगर - राहुल गांधी यांच्यासह श्रीनगर विमानतळावर पोहोचलेल्या ८ विरोधी पक्षांच्या ११ नेत्यांना तेथूनच परत पाठवण्यात आले. विमानतळावर या नेत्यांना अडवण्यात आल्यावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यानंतर प्रशासनाने त्यांना परत दिल्लीला पाठवले. 

राज्य प्रशासनाने परवानगी नाकारली असतानाही हे नेते शनिवारी काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. दरम्यान, भारतीय प्रेस परिषदेने खोऱ्यातील संचारबंदीचे समर्थन केले आहे. याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली असून काश्मीर टाइम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांनी संचारबंदीविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत हस्तक्षेपाची परवानगी परिषदेने याचिकेत मागितली आहे.
 

सपा, बसप नेते अनुपस्थित
काश्मीरला गेलेल्या प्रतिनिधी मंडळात सपा व बसपचे नेते सहभागी नव्हते. यात काँग्रेस, माकप, भाकप, द्रमुक, राष्ट्रवादी, जेडीएस, राजद व टीएमसीच्या नेत्यांचा समावेश होता.