Home | Bollywood | Marathi Cinekatta | 11 Marathi Stars In Rohit Shetty Simbha

ऐकलंत का... रणवीर सिंहच्या ‘सिम्बा’मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 11 मराठी स्टार्सची लागली वर्णी, सिद्धार्थ म्हणतो - 'रोहित सरांनी हिंदी नव्हे मराठी फिल्म बनवली आहे'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 24, 2018, 01:02 PM IST

सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकरसह 11 मराठी स्टार्स झळकले 'सिम्बा'मध्ये...

  • 11 Marathi Stars In Rohit Shetty Simbha

    धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट 'सिम्बा' हा येत्या 28 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होतोय. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा'मध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. पण त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर आणि सिध्दार्थ जाधव ही तब्बल अकरा मराठी कलाकारांची फौजही महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

    सध्या रणवीर-सारासोबत प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणतो, “रोहित सर मनाने राजा माणूस आहेत. ते ‘ब्लॉकबस्टर फिल्ममेकर’ आहेत. हे मला त्यांच्यासोबत ‘गोलमाल’ चित्रपट करतानाच कळले होते. त्यानंतर मराठी चित्रपटांत प्रचंड व्यस्त झाल्याने त्यांनी ऑफर केलेले पुढचे दोन चित्रपट मी करू शकलो नाही. पण 'सिम्बा'ने ती कसर भरून काढली आणि यावेळेस तर करण जोहरसारख्या निर्मात्यासोबत काम करायची संधी मिळाली.”

    सिध्दार्थ पुढे सांगतो, “रणवीर सिंहसारख्या सुपरस्टार्सने माझा वाढदिवस साजरा करावा किंवा मला आपल्या लग्नाचे आमंत्रण द्यावे, एवढे मला आपलेसे मानण्याने मी खूप भारावून गेलो आहे. या सगळ्यात दुग्ध शर्करा योग होता, तो म्हणजे मराठी सिनेसृष्टीतले अनेक उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटाचा हिस्सा होते. मी ब-याचदा मस्करीत म्हणतो, रोहित सरांनी एक मराठी फिल्म बनवलीये. ज्यामध्ये रणवीर सिंह आणि सारा अली खान आहेत.”

    वैदेही परशुरामी 'सिम्बा' चित्रपटामध्ये ‘आकृती’ या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती 'सिम्बा'च्या अनुभवाविषयी म्हणाली, “सिम्बासाठी जेव्हा मला बोलवण्यात आलं होतं. तेव्हा मला विश्वासच बसला नाही. कोणीतरी माझी मस्करी करतंय, असंच मला वाटलं होतं. पण जेव्हा मी रोहित सरांना भेटले तेव्हा मला पाहताच ते म्हणाले होते, हिच 'सिम्बा'मधली आकृती आहे. चित्रपट स्विकारल्यावर मला रणवीर, सारा आणि इतर मराठी कलाकारही या चित्रपटाचा भाग असल्याचे कळले.”


    'सिम्बा'मध्ये अकरा मराठी कलाकार असण्याबद्दल वैदेही पुढे म्हणते, “रोहित सरांना मराठी कलाकारांविषयी विशेष प्रेम आहे. मराठी कलाकारांमध्ये जो आपलेपणा आणि जो प्रोफेशनल एटिट्युड असतो, तो सरांना खूप आवडतो. रोहित सरांसकट त्यांची संपूर्ण टीम खूप मेहनती आहे आणि त्यांच्यासोबत प्रत्येक कलाकाराने एकदा तरी काम करायला हवे.”

    रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक दिसलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी काळसेकर. रोहित शेट्टीसोबत सहाव्यांदा काम करणा-या अश्विनी काळसेकर म्हणतात, “ मी रोहित शेट्टी यांना हिट मशीन म्हणते. त्यांच्या परिसस्पर्शाने प्रत्येक चांगल्या कथानकाचा उत्तम सिनेमा बनतो आणि तो सुपरहिट होतो. रोहित शेट्टी यांची शिस्त, वक्तशीरपणा आणि त्यांच्यातला सळसळता उत्साह यातून मी कलाकार म्हणून समृध्द होत गेले. 'सिम्बा'मुळे मला रणवीर सिंहसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि रणवीरकडून मी कळत-नकळत खूप शिकले. त्याच्या एवढा भूमिकेचा अभ्यास करणारा कलाकार मी पाहिला नाही. मला असं वाटतं, 'सिम्बा' ही फक्त हिट नाही तर ‘तोड-फोड’ हिट फिल्म असेल.”

    सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “मी सिंघममध्ये रोहित सरांसोबत काम केले होते. त्यानंतर आता 'सिम्बा'मधून पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करता आलं. अजय देवगण आणि रणवीर सिंह या दोन सुपरस्टार्ससोबत काम करण्याचा खूप वेगळा अनुभव होता. अजयसर जेवढे शांत तेवढाच रणवीर बोलका. रोहितसर आणि त्यांच्या टीमसोबत काम करताना मला अडचणींवर मात करताना व्यक्तिमत्वात आवश्यक असलेली सकारात्मकता शिकायला मिळाली.”

    अशोक समर्थ म्हणतात, “मला माझ्या आयुष्यातली पहिली कमर्शिअल हिट फिल्म पाहायला मिळाली, ती रोहित शेट्टींमुळेच. सिंघममूळे मी 100 कोटी क्लबमध्ये गेलो. सिंघम ते सिम्बा हा अविस्मरणीय प्रवास आहे. भारतीय सिनेसृष्टीतला आघाडीचा नट रणवीर सिंहकडून आपल्या अगोदरच्या सिनेमातल्या अभिनयाविषयी कौतुकाची थाप मिळावी, ही माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी तर आनंदाचीच बाब होती. रोहितसरांना मी त्या आघाडीच्या दिग्दर्शकांमधला मानतो, ज्यांना आपल्या नटांकडून चोख परफॉर्मन्स काढून घेता येतो.

    रोहित शेट्टीच्या सिनेमात पाचव्यांदा काम करणारे विजय पाटकर म्हणतात, “अभिनेत्यांकडून चांगला अभिनय करून घ्यायचा असेल, तर त्यांना रिलॅक्स करावे लागते, हे रोहित शेट्टी यांना चांगले माहित आहे. मला रोहित शेट्टींचे काटेखोरपणे काम करणे आवडते. मराठी नटांसोबत काम करताना मजा येते, असं नेहमी रोहित शेट्टी म्हणतात.”

  • 11 Marathi Stars In Rohit Shetty Simbha
  • 11 Marathi Stars In Rohit Shetty Simbha

Trending