आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारत-ऑस्ट्रेलिया झुंज रंगणार : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ सामने; आतापर्यंत सर्वच लढती अटीतटीच्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओव्हल - सलामीच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला. भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना रविवारी ऑस्ट्रेलियाशी हाेणार आहे. भारताचा या सामन्यातील विजयाचा दावा अधिक मजबूत मानला जाताे. विश्वचषकात भारताविरुद्ध सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. या टीमने आतापर्यंत सातत्याने भारताविरुद्ध दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्यामुळे आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने प्रचंड दबावात खेळले आहेत. मात्र, आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचे ११ सामने झाले. यातील नऊ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाची नाेंद करता आली. म्हणजेच माेठ्या स्पर्धेत अव्वल खेळाडूंवर चांगल्या कामगिरीसाठी प्रचंड दबाव असताे.  

 

ऑस्ट्रेलियाची भारतावर मात : मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताच पराभव केला हाेता. ऑस्ट्रेलियाने पाच वनडे सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली. त्यामुळे यजमान भारताला ही मालिका गमवावी लागली. सुरुवातीला सलगच्या दाेन सामन्यांतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केले. त्यानंतर सलग तिन्ही सामने जिंकून  या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया संघात अनुभवी फलंदाज स्मिथ आणि डेव्हिड वाॅर्नरचा समावेश नव्हता.  

 

काेहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ शतके :  कर्णधार विराट काेहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी सरस ठरली आहे. त्याने ८ शतके झळकावली. त्याने ३६ सामन्यांत ५३ च्या सरासरीने १६४५ धावा काढल्या. यात आठ शतकांसह पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच राेहितने ३६ सामन्यांत ६२ च्या सरासरीने १९८० धावा काढल्या.

 

> वनडेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्युत्तरात ३९ % सामने जिंकले, वर्ल्डकपमध्ये १४ %

> टीम इंडियामध्ये बदलाची शक्यता;कुलदीप यादवच्या जागी मिळू शकेल शमीला संधी

> खेळपट्टी :  स्पर्धेच्या तीन मॅचच्या तीन डावात ३००+ स्काेअर झाला. आताही माेठी धावसंख्या हाेऊ शकेल नाेंद. 
> हवामान : १९ ते २९ डिग्री सेल्सियसचे तापमानाने पावसाची शक्यता. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाची गाेलंदाजीला पसंती.