आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजाराने तडफडत होते 11 महिन्याचे बाळ, वेळेवर रूग्णालयात दाखल करूनही नर्सच्या एका चुकीमुळे गेला चिमुकल्याचा जीव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अशोकनगर (मध्य प्रदेश)  : मंगळवारी येथील जिल्हा रूग्णायलात 11 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मुलाला गंभीर अवस्थेत रूग्णायलात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी वेळ  न दडवता त्याला शिशू वार्डमध्ये भर्ती करून घेतले. तेथे ऑक्सीजन सिलेंडर सुरू करण्यासाठी उशीर झाला आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला. वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या नर्सचे म्हणणे आहे की, पालकांनी मुलाला ब्रॅड डेड अवस्थेत दाखल केले होते. ऑक्सीजन सिलेंडर सुरू न झाल्यामुळे त्याला इलेक्ट्रिक मशीनने ऑक्सीजन दिले. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना याबाबत व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे. 

 

कुटुंबीय नर्सला ठरवत आहेत दोषी

जिल्हा रूग्णायलात बेरखेडी येथून एका 11 महिन्याच्या बाळाला गंभीर अवस्थेत दाखल केले होते. डॉक्टरांनी मुलाची अवस्था पाहून कागदपत्र तयार करण्यामध्ये वेळ न घालविता त्याला ऑक्सीजन देण्यासाठी थेट शिशू वार्डमध्ये पाठविले. पण तेथे ऑक्सीजन सिलेंडर सुरु करण्यासाठी चावी न मिळाल्यामुळे चावी आणण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्याला खाली पाठविले. तोपर्यंत नर्सने इलेक्ट्रिक ऑक्सीजन मशीनने मुलाला ऑक्सीजन दिला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रूग्णायलाच्या गेटवर 30 मिनिटापर्यंत आक्रोश व्यक्त केला. त्यांनी व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप लावत मुलाच्या मृत्यूसाठी कार्यरत असलेल्या नर्सला दोषी ठरविले आहे. 


यामुळे झाला सिलेंडर सुरू करण्यास उशीर

ड्यूटीवर वर असलेली नर्स श्रीमती पांडेने सांगितले की, ऑक्सीजन सिलेंडरची कडी खूप फिट बसवलेली असते आणि या  कडीला एखादा प्रशिक्षित व्यक्तीच उघडू शकतो. रूग्णायलात अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रभाग क्रमांक 8 येथून कर्मचाऱ्यांनी पाचारण करावे लागते. अशा परिस्थितीत आपत्काळासाठी दुसरा पर्याय म्हणून इलेक्ट्रिक मशीन शीशू वार्डमध्ये ठेवण्यात आली आहे. पण वार्डमध्ये भर्ती करण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला असल्याचे नर्सने सांगितले. 

 

प्रकृती खूपच गंभीर असल्यामुळे पाठविले वॉर्डमध्ये
डॉक्टर जैतवार यांनी सांगितले की, बाळाला रूग्णायलात दाखल केले तेव्हा त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती. आम्ही वेळ वाया न घालवता बाळाला शीशू वार्डमध्ये ऑक्सीजन देण्यासाठी पाठविले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलाला निमोनिया सारखा आजार होता. डॉक्टरांच्या मते मुलाची प्रकृती इतकी गंभीर होती की, जर कागदपत्रे बनविले असते तर तेव्हाच त्याचा जीव गेला असता.